Take a fresh look at your lifestyle.

Private sector jobs : कृपया घरी जा, तुमच्या कामाचे तास संपले; शिफ्ट संपल्याची आठवण करून देणाऱ्या या कंपनीबाबत नक्की वाचा

0

मागील काही वर्षांपासून खासगी क्षेत्रातील नोकरदार वर्गाचं आयुष्य काहीसं कठीण झालं आहे. अनेक ठिकाणी 8 तासांहून अधिक नोकरी, त्यातही जास्तीचं काम, सुट्टीच्या दिवशी बॉसचे येणारे फोन या सर्व गोष्टीमुळे अनेकांचंच जगणं कठीण झाले आहे. पण, कितीही मनस्ताप झाला तरीही काही महत्त्वाच्या गरजांच्या पूर्ततांसाठी आणि मुख्य म्हणजे नोकरीवर टिकून राहण्याचा निर्णय प्रत्येकजण घेत असतो. पण, कामाचा भार मात्र काही केल्या कमी होत नाहीये.

तुम्हाला तुमचा पगार हा ठराविक तासांचा मिळणार असतो पण तरी देखील Beyond the limit जाऊन काम करणं अपेक्षित असते. असं अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची निवड करतानाच सांगतात. याचा अर्थ नोकरीच्या Shift Hours पलीकडे जाऊन जास्त तास ऑफिसमध्ये (office) काम कराव लागलं तर ते तुम्ही नाकारू शकत नाही. या एका मुद्द्यावरून दर दिवशी अनेकांच्याच तळपायाची आग मस्तकात जाते.

परंतु आता चिंता नको.. कारण आता कर्मचाऱ्यांना होणारा त्रास, त्यांचा मनस्ताप या साऱ्याची चिंता करणार कोण? असा सवाल विचारणाऱ्यांना आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. कारण, मध्य प्रदेशातील एका कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळं कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. कारण, ही कंपनी चक्क कामाचे तास पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ‘आता घरी जा’ असं सांगताना दिसत आहे.

काय आहे नेमके प्रकरण? कोणती कंपनी कर्मचाऱ्यांना पाठवते घरी

सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील SoftGrid Computers या कंपनीत काम करणाऱ्या तन्वी खंडेलवाल या तरुणीनं तिच्या LinkedIn अकाऊंटवरून याबाबतची एक खास पोस्ट लिहिली.

https://www.linkedin.com/posts/tanvi-khandelwal-57a426182_softgrid-computers-activity-7031634347896025088-Upsj?utm_source=li_share&utm_content=feedcontent&utm_medium=g_dt_web&utm_campaign=copy

‘Warning… तुमच्या कामाचे तास संपले आहेत. ऑफिसची सिस्टीम पुढच्या 10 मिनिटांत बंद होईल. कृपया घरी जा…’ असे मेसेज डेस्कटॉप स्क्रिनवर दिसत असतानाचा एक फोटो तिनं शेअर केला. कॅप्शनमध्ये तिनं ही कोणती काल्पनिक किंवा पैसे घेऊन लिहिलेली पोस्ट नसल्याचंही स्पष्ट केलं. आपल्या कंपनीकडून #WorkLifeBalance ला प्राधान्य दिलं जातं असं सांगताना त्यांच्या कंपनीच्या Computer मध्ये अशी व्यवस्था केली आहे जिथं कामाच्या निर्धारित तासांनंतर आपल्याला तशी आठवण करून देणारा एक मेसेज दिसतो असं सांगितलं.

एकिकडे एलॉन मस्कच्या कंपन्या तर दुसरीकडे आपल्या भारतातील हि कंपनी….

एकिकडे ट्विटरची मालकी हाती आल्यावर कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 80 तास काम करणं अपेक्षित आहे असं म्हणत त्यांच्यावर कामाचा भार वाढवणारा एलॉन मस्क आणि दुसरीकडे भारतात कर्मचाऱ्यांना नोकरीपलीकडेही आयुष्य आहे याचीच आठवण करून देणारी हि संस्था पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांची इतकी काळजी करणाऱ्या या company विषयीची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनीच तिथं काम करण्याची संधी मिळेल का अशी विचारणा केली, तर कुणी आम्ही ही पोस्ट आमच्याही Boss ला दाखवतो असं म्हटलं. तुमचं या अनोख्या संकल्पनेबाबत काय मत?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues