Take a fresh look at your lifestyle.

Potato Variety : बटाट्याची ‘ही’ जात भरघोस उत्पादन देईल, माहिती करून घ्या…

0

Krushidoot : बारमाही भाज्यांपैकी एक म्हणजे बटाटा. बाजारात त्याची मागणी नेहमीच असते. याचा कारणास्तव बटाट्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीच नफा मिळतो. याच पार्श्वभूमीवर बटाट्याच्या विविध जातींबद्दल Potato Variety माहिती असायला हवी, ज्याची लागवड करून शेतकरी भरघोस नफा कमवू शकतात.

आयसीएआरच्या मते, जर तुम्हाला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बटाट्याची शेती करायची असेल, तर ‘कुफरी पुखराज’ Kufri Pukhraj जातीला प्राधान्य द्या. ही जात उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे. कारण हीच जात कमी काळात उच्च उत्पन्नासाठीही ओळखली जाते.

बटाट्याच्या या जातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या पिकावर रोगांचे प्रमाण कमी आहे. यावर पडणाऱ्या दवामुळे हे पीक खराब होण्याची शक्यता कमी आहे. हे पीक सुमारे 100 दिवसांत तयार होते. एका हेक्टरमध्ये अंदाजे 400 क्विंटलपर्यंतचे पीक त्यातून तयार होते. उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, झारखंड, आसाम, पंजाब, हरियाणा, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांतील एकूण बटाटा उत्पादनात कुफरी पुष्कराजचा वाटा जवळपास 80 टक्के आहे. देशभरातील बटाट्याच्या एकूण उत्पादनात त्याचा वाटा 33 टक्के आहे. 2021-22 या वर्षात वार्षिक आर्थिक अधिशेष 4729 कोटी रुपये होता.

बटाट्यामध्ये स्टार्च, प्रोटीन, व्हिटॅमिन-सी आणि खनिज क्षार मुबलक प्रमाणात आढळतात. जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची वेळेवर पेरणी, खतांचा संतुलित प्रमाणात वापर, योग्य कीटकनाशके आणि बटाट्याचे अधिक उत्पादन घेऊन शेतकरी उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढवू शकतात, एवढं नक्की.

हेही वाचा :
अमेरिकन शेतकरी भारतीय शेतकऱ्यांपेक्षा का पुढे आहेत, जाणून घ्या कारण
बटाटे आणि तांदूळ यापासून ‘हा’ फायदेशीर व्यवसाय सुरू करा, होईल मोठी कमाई

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues