Take a fresh look at your lifestyle.

Postal Ballot : मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेट म्हणजे नेमके काय?

0

Postal Ballot काही वेळातच गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार व कोणाचे सरकार स्थापन होणार याची उत्सुकता शिगेला आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून या दोनीही राज्यात पोस्टल मतपत्रिकैची मतमोजणी सुरू झाली असून यानंतर बरोबर 9 च्या सुमारास ईव्हीएमद्वारे (EVM) पडलेल्या मतांची मोजणी सुरू झाली.

Postal Ballot यामध्ये प्रामुख्याने मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने आकडेवारी जारी केली जाते. तर अशा परिस्थितीत सर्वात अगोदर मतमोजणी केले जाणारे पोस्टल बॅलेटची भूमिका हि महत्त्वाची असते. नेमके काय आहे पोस्टल बॅलेट? जाणून घ्या या विषयी थोडक्यात

पोस्टल बॅलेट म्हणजे नेमके काय?

Postal Ballot पोस्टल बॅलेट म्हणजे हे एक पोस्टल मतपत्र आहे. हे 1980 च्या दशकातील पेपर बॅलेट पेपरसारखेच आहे. जे लोक त्यांच्या नोकरीमुळे त्यांच्या मतदारसंघात मतदान करू शकत नाहीत त्यांच्याद्वारे निवडणुकीत याचा वापर केला जातो. जेव्हा हे लोक टपालाच्या मदतीने मतदान करतात तेव्हा त्यांना सर्व्हिस व्होटर किंवा गैरहजर मतदार असेही म्हणतात. निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा अधिकार काही ओळखीच्या लोकांनाच दिला आहे.

Postal Ballot पोस्टल बॅलेटद्वारे कोणाला मतदान करता येते?

▪️ लष्करी, निमलष्करी दल
▪️ निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी
▪️ देशाबाहेर काम करणारे सरकारी अधिकारी
▪️ प्रतिबंधात्मक अटकेतील लोक (कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही.)
▪️ 80 वर्षांवरील मतदार (नोंदणी आवश्यक आहे)
▪️ अपंग व्यक्ती (नोंदणी आवश्यक आहे)
▪️ पत्रकार (ही सुविधा यावर्षी देण्यात आली आहे. त्यांनाही नोंदणी करावी लागेल.)
▪️ रेल्वेसह अत्यावश्यक सेवांमध्ये गुंतलेल्या इतर 11 विभागांच्या सरकारी कर्मचाऱ्यांनाही यावेळी परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा : दिल्लीत ‘आप’च बाप, भाजप आणि काँग्रेस साफ; जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues