Take a fresh look at your lifestyle.

PM Svanidhi Yojana : व्यावसायिक दुकानदारांना मिळणार 50 हजार रुपये; पीएम स्वनिधी योजना

0

PM Svanidhi Yojana गेल्या २ वर्षांत कित्येकांचे रोजगार गेले. तर काहींना कमी पगारावर काम करावं लागतंय. यातूनच सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थितीचे खच्चीकरण होऊ लागले होते. यामध्ये छोटे-मोठे व्यावसायिक दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र आता सरकारने सर्वसामान्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत व्यवसायिक दुकानदारांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

PM Swanidhi Yojana या व्यावसायिकांना खेळते भांडवल म्हणून 10 हजारांचे निधी देण्यात येणार आहे. 2020 साली या योजनेची सुरुवात झाली होती. सरकार नेहमीच सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुरळीत व्हावे यासाठी प्रयत्नशील असते. वेगवेगळ्या समाजोपयोगी योजना राबवून त्यामार्फत नागरिकांना आर्थिक सहाय्य केले जाते. त्यातीलच ही एक योजना. आता जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

PM Svanidhi Yojana जाणून घेऊया पीएम स्वनिधी योजना :
या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे. यापूर्वी 10 हजार रुपयांचे भांडवल करणाऱ्या व्यवसायिक दुकानदारांना योजनेचा लाभ मिळत असे. त्यानंतर व्यवसायिक दुकानदारांना 20 हजार रुपये देण्यात आले होते. परंतु आता सरकार या योजनेअंतर्गत व्यवसायिक दुकानदारांना 50 हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवल देत आहेत. यासाठी अर्ज केल्यास तुम्हाला 10 हजार रुपयापर्यंत खेळते भांडवल कर्ज (Business Loan) म्हणून देण्यात येईल. हे कर्ज घेतल्यानंतर कर्जाची वेळेत परतफेड (Loan Repayment ) केल्यास तुम्हाला दुसऱ्या टर्ममध्ये 20 हजारांचे आणि तिसऱ्या टर्ममध्ये 50 हजारांचे कर्ज मिळेल.

PM Svanidhi Yojana योजनेतील टप्पे :
PM Svanidhi Yojana योजनेच्या पहिल्या टर्मसाठी तब्बल 42 लाख 11 हजार 981 व्यवसायिक दुकानदारांनी कर्जासाठी अर्ज Business Loan केले होते. त्यातील जवळपास 30 लाख 722 लाभार्थ्यांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. आणि यामधील 7 लाख 36 हजार 975 लाभार्थ्यांनी कर्जाची वेळेत परतफेड (Loan Repayment ) केली असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यासाठी मागणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 2 लाख 29 हजार 402 लाभार्थ्यांनी 20 हजारांच्या भांडवलासाठी अर्ज केले असून त्यातील 3 लाख 48 हजार 783 लाभार्थ्यांना 2019 मध्ये कर्ज देण्यात आले आहेत.

BT Cotton कपाशीच्या बियात बी टी तंत्रज्ञान असूनही बोंड अळी Ball Worm का येते? आत्ताच जाणून घ्या उपाययोजना

PM Svanidhi Yojana आता जून 2022 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी 20 लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आणि यामध्ये 4 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. आता या 4 लाभार्थ्यांना लवकरच कर्ज वितरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ही योजना डिसेंबर 2024 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे.

PM Svanidhi Yojana कोणते व्यवसायिक ठरू शकतात लाभार्थी :
भाजोविक्रेते, फळविक्रेते, वडापावची गाडी, छोटे कपड्याचे दुकान अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय असलेल्या दुकानदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या व्यवसायिक नागरिकांनाच या योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा अर्ज ऑनलाईन भरू शकता किंवा मग सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन या योजनेचा लाभार्थी बनण्यासाठी अर्ज भरावा.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues