Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan Yojana : खुशखबर – अखेर पीएम किसान योजनेचा 13व्या हप्त्याचा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी होणार जमा

0

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या बाबतीत शेकऱ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 12 हप्ते आतापर्यंत हस्तांतरित केले आहेत, तर 13 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु 13 वा हप्ता कधी खात्यात जमा होणार याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार.. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) तेरावा हप्ता या महिन्यात अखेरीस बळीराजाच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेतंर्गतचा तेरावा हप्ता येत्या 27 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सरकारने सांगतिले आहे.

आपला स्टेटस कसा चेक कराल?

  • सर्वप्रथम pmkisan.gov.in ला अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • यानंतर होमपेजवरील ‘Farmers Corner’ सेक्शन विभागांतर्गत ‘Beneficiary Status’ पर्याय निवडा.
  • नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका
  • ‘डेटा मिळवा’ वर क्लिक करा.
  • व सर्वात शेवटी हप्त्याची स्थिती कळेल.

यांना लाभ मिळणार नाही
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे EKYC पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसान वेबसाईटनुसार, पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. OTP आधारित eKYC PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. बायोमेट्रिक आधारित eKYC साठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधता येईल. eKYC ची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues