Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan पीएम किसानमध्ये फसवणूक थांबवण्यासाठी आता वयाची अट; जाणून घ्या काय आहे प्रकरण

0

PM Kisan केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan Sanman Nidhi Yojna) फसवणूक रोखण्यासाठी सरकारकडून नेहमीच नाव नवीन नियम आखले जातात. मागील काही दिवसांपासून अर्ज करताना जमिनीची कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेत PM Kisan Sanman Nidhi Yojna फसवणुकीत वाढ झाल्याची आणि अपात्रांकडून वार्षिक 6000 रुपये घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अपात्रांना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत.

PM Kisan सरकारने पीएम किसान योजनेतील अडथळे टाळण्यासाठी आणि अपात्रांच्या छाटणीसाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. नवीन प्रणालीनुसार, केवळ तेच शेतकरी योजनेसाठी पात्र असतील, ज्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 2001 पूर्वी झाला असेल. त्यानुसार 21 वर्षे वयाची व्यक्तीच ‘या’ योजनेसाठी पात्र असेल. 1 फेब्रुवारी 2001 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येणार नाही.

PM Kisan 1 फेब्रुवारी 2001 नंतर जन्मलेल्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे . या तारखेनंतर जन्मलेल्या, ज्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांचा निधीही बंद केला जाईल. या संदर्भात, कृषी संचालक, सर्व जिल्ह्यांचे कृषी जिल्हा दंडाधिकारी, एडीएम आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवले आहे. काही दिवसांपूर्वी PM Kisan योजनेतील वाढती फसवणूक रोखण्यासाठी ई-केवायसीचीही तरतूद करण्यात आली आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues