Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan : सरकारकडून नवीन वर्षात शेतकऱ्यांना गिफ्ट! खात्यात 2 हजार रुपये जमा होणार

0

PM Kisan केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता शेतकरी 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

PM Kisan माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील 13 वा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी 2023 च्या सुरुवातीच्या दिवसांत जारी केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप 13व्या हप्त्याबाबतची अधिकृत नोटीस सरकारने जारी केलेली नाही. योजनेचा 12वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता.

PM Kisan 13व्या हप्त्यापूर्वी दोन गोष्टी आवश्यक : जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढचा म्हणजे 13वा हप्ता तुमच्या खात्यात जमा करायचा असेल, तर त्याआधी तुम्हाला ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तुम्ही अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाईन ई-केवायसी करू शकता. जमिनीची पडताळणी न करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात येणार आहेत.

PM Kisan किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपयांची रक्कम दिली जाते. शेतकर्‍यांच्या खात्यावर 2 हजार रुपये 3 हप्त्यांमध्ये वर्ग केले जातात. वेळापत्रकानुसार, वर्षाचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 31 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत जमा केला जातो.

हेही वाचा : राज्यात लवकरच 10000 पदांसाठी ग्रामसेवक भरती होणार; जाणून घ्या तारखा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues