Take a fresh look at your lifestyle.

PM Kisan : पीएम किसान योजनेचे पैसे खात्यावर का येत नाही? जाणून घ्या या मागील नेमके कारण

0

PM Kisan भारतातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 12 हफ्ते देण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. यंदाच्या 12 व्या हफ्त्यात शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून पैसे का आले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे.

PM Kisan पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात न येण्याची अनेक कारणे असू शकतात. म्हणूनच केंद्र सरकारच्या या 12 व्या हप्त्यापासून कोट्यवधी शेतकरी नव्या यादीपासून वंचित राहिले असून केंद्र तसेच राज्य सरकारच्या E-Kyc निर्बंधतेमुळे अनेक नवीन लाभार्थ्यांची नावे PM किसान योजनेतून वगळण्यात आली असल्याचे समोर आले आहे. पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात न येण्याचे नेमके करणे काय असू शकतात? वाचा सविस्तर

PM Kisan पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात न येण्याची काही करणे..!! :

▪️ ज्या कुटुंबात कर्जदार व्यक्ती आहे त्यांना पीम किसान योजेनचा लाभ मिळणार नाही, ज्या कुटुंबात पती-पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

▪️ जे लोक शेती ऐवजी इतर कामांसाठी शेतजमीन वापरत आहेत. त्यांनाही यंदा या योजनेतून वगळण्यात आले आहे.

▪️ याशिवाय अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती कसतात, ती त्यांच्या नावावर नसते. इतकंच काय तर आई-वडिलांच्या नावावर असते पण शेती मुलं करतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही.

▪️ एखाद्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे, पण तो व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त असेल तर त्यालाही या योजेनचा लाभ मिळणार नाही.

▪️ याशिवाय ज्यांच्या नावावर शेती आहे परंतु तोच व्यक्ती विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर त्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही.

▪️ तसेच एखादा व्यक्ती नोंदणीकृत- इंजिनीअर, डॉक्टर, CA, वकील, व्यक्ती शेताचा मालक आहे, परंतु त्याला दरमहा दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही.

दरम्यान, तुमचे सर्व कागदपत्र जर बरोबर असतील तरी देखील तुम्हाला जर 12 व्हा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही [email protected] या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. अन्यथा हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता..

Leave A Reply

Your email address will not be published.