Take a fresh look at your lifestyle.

Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशन आजपासून

0

Parliament Winter Session आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज 7 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत 23 दिवसांचं हे हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10 वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याची शक्यता आहे.

Parliament Winter Session प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी केलीय. काँग्रेसचे खासदार विविध मुद्यावरुन आज सभागृहात आवाज उठवण्याची शक्यता आहे. भारत-चीन सीमा विवाद, घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप यासह महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीबाबत काँग्रेसकडून सभागृहात मुद्दे आक्रमकपणे उपस्थित केले जाऊ शकतात.

हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय! फेरीवाले अन् हातगाडीवाल्यांनाही आता मिळणार रोजगार

Parliament Winter Session त्याचबरोबर हमीभावाच्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. भारत जोडो यात्रेमुळं काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी, खासदार जयराम रमेश आणि खासदार दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

Parliament Winter Session नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात संसदेचं अधिवेशन होणार होतं. मात्र, गुजरात निवडणुकीमुळं हे अधिवेशन उशीरानं सुरु होत आहे. हे अधिवेशन डिसेंबरच्या शेवटपर्यंत म्हणजे 29 डिसेंबरपर्यंत असणार.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues