Take a fresh look at your lifestyle.

inflation : भारताच्या शेजारील देशात महागाईचा हाहा:कार; गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतात 10 हजार रुपये

0

2022 मध्ये भारताचा शेजारी देश श्रीलंका कंगाल होण्याच्या मार्गावर पोहोचला होता. तर या ठिकाणी महागाईने लोक त्रासले असून राजकारणातही खळबळ माजली होती. आता नवं वर्ष 2023 सुरू झालं असून श्रीलंकेप्रमाणेच परिस्थिती दुसरा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची झाली आहे. (pakistan inflation)

सध्याच्या घडीला पाकिस्तानात महागाईचा इतकी बिकट झाली असून यादेशातील लोक मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहत आहेत. यामुळे तेथील लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर सध्या पाकिस्तानची इतकी बिकट अवस्था आहे भारतात 5 रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्कीट पाकिस्तानात 50 रुपयांना विकले जात आहे. तर आपल्या देशात 40-50 रुपयांना मिळणारी ब्रेड पाकिस्तानमध्ये 150-200 रुपयांना विकली जात आहे.

तर पाकिस्तानात 450 रुपये किलोने पीठ विकले जात आहे. रिफाइंड तेल 850 प्रति लिटर झाले आहे. दरात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे अक्षरशः पाकिस्तानात जनता रस्त्यावर आली आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तान मध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 2411.43 रुपये तर व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत सुमारे 10,000 रुपये झाली आहे.

दरम्यान, साखर, गहू, गॅस सिलेंडर सारख्या गोष्टी महाग होत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानात विजेचीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकारसमोर विजेच्या कमतरतेची मोठी समस्या आहे. पाकिस्तानी डिफेन्स मिनिस्टरने विज वापर कमी करण्यासाठी आदेशही जारी केले आहेत. पाकिस्तानात गरीबी दरातही ३५.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल पॉवर्टी इन्डेक्सच्या यादीमध्ये 116 देशांपैकी 92 व्या स्थानावर पोहोचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues