Take a fresh look at your lifestyle.

मालक!! आम्हाला मुक्तपणे जगण्याचा अधिकार नाही का?

0

१) आम्ही एकाच जागेवर चारा पाण्याची वाट पाहत बसतो हि आणि झोपतोही.
२) एकाच जागेवर चारा ही खातो आणि शेण ही टाकतो.
३) पिण्यासाठी जेव्हा जेवढे पाणी मिळेल तेव्हा तेवढे पिऊन घेतो.
४) पावसाळ्यात चिखल झाला तर त्याच जागेवर बसतो तसेच कधी कधी रात्रभर उभे हि राहावे लागते.
५) एकाच जागेवर आमची गर्भधारणा तपासणी सोबत डिलिव्हरी पण होते.
६) तेवढ्याच जागेत आमच्या पोटात नऊ महिने गर्भ वाढतो.
७) दावणीवर किंवा बांधलेल्या जागेवर आमचा झार/वार पडतो.
८) एकाच जागेवर धार ही काढली जाते आणि वासराला ही पाजले जाते.
९) त्याच जागेवर आजारी ही पडतो आणि त्याच ठिकाणी उपचार ही केला जातो.
१०) कधी गरज वाटली तर आम्हाला अंघोळ ही त्याच ठरलेल्या ठिकाणी करायला मिळते.
११) एकाच ठिकाणी दिवसेंदिवस राहिल्यामुळे अंगाला ताठरता येते त्यामुळे अपचनाचा त्रास संभवतो.
१२) मला आजारी स्थितीत पाहून सुद्धा पशुवैद्यक जास्त पैसे घेतात म्हणून उपचार करण्याचे टाळता किंवा
उपचार कारण्यासाठी १-२ दिवस वाया घालवता.


१३) मी दूध देत नसेल तर मला चारा पाण्यासाठी वेगळी वागणूक दिली जाते तसेच वेगळ्या गोठ्यामध्ये
ठेवले जाते.
१४) धार काढताना मागच्या पायावर चा भार जास्त वेळ पेलता येत नाही त्यामुळे वात येते आम्हाला पाय
हलवावा लागतो तो हलवू नये म्हणून दोरीने बांधले जाते.
१५) नाकात वेसन, कानात टॅग, गळ्यात कंडा/घंटी, तोंडाला मोरखी, पायात दोरी, एवढा साखळदंड फक्त
दुधाच्या स्वार्थासाठी असतो.
१६) वर्षातून एकदा येणारा आमचा बैलपोळा सण देखील त्याच जागेवर साजरा केला जातो.
१७) घरातील कार्याच्या किंवा लग्न समारंभाच्या वेळी चारा पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

१८) लग्न समारंभातील शिल्लक राहिलेले पदार्थ भात, पुरी, भाजी असेल असे नको असलेले तेलकट पदार्थ
वाया जाऊ नयेत म्हणून खायला दिले जातात.

लेखक :
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा. ८००७३१३५९७

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

Leave A Reply

Your email address will not be published.