Take a fresh look at your lifestyle.

ग्रामीण भागातील युवकांसाठी संधी; सरकारी योजनेतून सुरु करा व्यवसाय!

0

शेतीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी सरकार, संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठे नेहमीच प्रयत्नशील आहेत. यासाठी सरकार विविध योजना देखील राबवत असते. अशीच एक योजना ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक आणि शेतकरी अशा दोघांसाठी फायदेशीर आहे.

सध्या सरकार माती परीक्षणावर भर देत आहे. त्याअनुषंगाने गावात मृदा परीक्षण प्रयोगशाळा सुरु करुन युवकांना रोजगारसंधी मिळू शकते. देशात सध्या लहान मोठ्या स्वरुपाच्या एकूण 7,949 माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत. मात्र शेतकरी संख्या आणि शेतीक्षेत्र पाहता ती पुरेशी नाही.

नुकतीच सरकारने 10,845 प्रयोगशाळांना मंजुरी दिलीय. देशात सुमारे 6.5 लाख गावे असून ही संख्या पाहता यातुलनेत 82 गावांसाठी एक प्रयोगशाळा असे प्रमाण होते. प्रयोगशाळांची संख्या कमी असल्या कारणाने माती परीक्षण योग्य पध्दतीने होत नसल्याचे चित्र आहे. विचार करता सध्या देशाला किमान किमान 2 लाख प्रयोगशाळांची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु करणे एक चांगली संधी चालून आली आहे. सरकार प्रयोगशाळा चालकाला दिलेले 2.5 लाख रुपये हे तपासणी मशीन, रसायने आणि प्रयोगशाळा चालवण्यासाठी आवश्यक गोष्टींवर खर्च करावे लागणार आहेत. माती परीक्षण प्रयोगशाळा संबंधित व्यक्ती एखादी जागा भाडेतत्वावर घेऊ शकतो किंवा फिरती मोबाईल माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु करु शकतो.

लाभ घेण्यासाठी ‘हे’ करा!

● योजनेसाठी जिल्हा कृषी उपसंचालक किंवा सहसंचालक तसेच नजीकच्या कृषी कार्यालयात अर्ज करा.
● याकरिता ग्रामीण भागातील 18 ते 40 वर्ष वयोगटातील युवक अर्ज करु शकतात.
● संबंधित युवक विज्ञान विषयासह व्दितीय श्रेणीत मॅट्रिक उत्तीर्ण झालेला असावा, तसेच त्याने ॲग्री क्लिनीक आणि कृषी उद्योजकता प्रशिक्षण घेतलेले असावे.
● याबाबत अधिक माहिती ag ricoop.nic.in किंवा soilhealth.dac.gov.in या वेबसाईटवर मिळू शकते किंवा किसान कॉल सेंटरच्या 1800-180-1551 या क्रमांकावरुनही माहिती घेऊ शकता.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues