Take a fresh look at your lifestyle.

संधी! पीक पाहणी ‌अ‍ॅपच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

0

महाराष्ट्र सरकारनं यंदा ई-पीक पाहणी अ‍ॅप सुरु केलं असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ‌अ‍ॅपची नोंदणी करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘ई पीक पाहणी’ अ‍ॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना महिन्याभराची मुदत देण्यात आली होती. मात्र एकंदर परिस्थिती आता सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला 15 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या स्तरावर पीक पाहणी 30 सप्टेंबरपर्यंत करु शकतात. तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.