Take a fresh look at your lifestyle.

शेळीपालनातील विक्री व्यवस्थापनाची संधी

0

शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी विक्री व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास व शास्त्रशुद्ध माहिती मिळवणे खूप गरजेचे असते तरच या व्यवसायातील संभाव्य नुकसान टाळता येईल. त्यासाठी आपणाला या व्यवसायातून कोणते उत्पन्न घ्यावयाचे आहे, शेळीपालनाचा मुख्य उद्देश काय आहे, व्यवसायात नवनवीन विक्रीव्यवस्थापनाच्या संधी काय आहेत हे जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे.


 शेळीपालनाचा व्यावसायिक दृष्टिकोन कोणता?

१) स्थानिक मटणाच्या दुकानात बोकड विक्री. २) बकरी ईद साठी बोकड तयार करणे. ३) प्रदर्शनासाठी व पैदाशीसाठी बोकड तयार करणे. ४) मांस निर्यातीसाठी. ५) लेंडीखत निर्मितीसाठी. ६) दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती.


 १) स्थानिक मटणाच्या दुकानात बोकड विक्री : स्थानिक मार्केटसाठी बोकड तयार करून आपण आपले स्वतःचे मार्केट तयार करू शकतो. त्यामुळे आपल्याला मार्केटसाठी दुर जाण्याची गरज भासणार नाही. तसेच लोकल मार्केटसाठी तयार केलेल्या बोकडांची वर्षभर उलाढाल चालू असते, मार्केट कायम सुरू असल्यामुळे आपले उत्पन्न हे कायम सुरू राहते त्यामुळे या व्यवसायामध्ये येणाऱ्या प्रत्येकाने सुरवातीला स्थानिक मार्केटसाठी बोकड तयार करावे. स्थानिक मार्केटसाठी उस्मानीबादी शेळी हा एकदम परिपूर्ण पर्याय आहे कारण उस्मानाबादी शेळ्यांची उत्पादनक्षमता चांगली असते. तसेच उस्मानीबादी शेळीचे मांस रुचकर असल्याने स्थानिक बाजार पेठांमध्ये शेळ्यांच्या मांसाला चांगली मागणी असते त्यामुळे बोकडप्रमाणे मटन दुकानदार पाटीही कापतात यामुळे पाटीलाही चांगला दर मिळतो. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात उस्मानीबादी शेळ्या चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात.
 २) बकरी ईद साठी बोकड तयार करणे : बकरी ईद हा मुस्लिम बांधवांचा मोठा सण असतो. कुर्बानीसाठी तयार केलेल्या बोकडांना चांगली किंमत मिळते. कुर्बानीसाठी बोकड एक वर्ष वय, रुबाबदार, तरतरीत, उंच, रंगीबेरंगी, धष्टपुष्ट व अंगावर कुठलीही जखम नसलेल्या बोंडांना प्रचंड मागणी असते. मुंबई मधील देवनार हा बकरी ईद साठी भरणार सगळ्यात मोठा बाजार आहे. त्याच प्रमाणे मोठं मोठ्या शहरात शेळ्यांचे बाजार भारतात. बोकडाच्या डोक्याच्या चंद्रकोरीप्रमाणे चांगला बांधा असणाऱ्या बोकडाला मागेल तेवढी किंमत मिळते. बकरी ईद साठी प्रामुख्याने शिरोही व बिटल या जातींना प्राधान्य दिले जाते कारण ती बोकडे बांध्याने मोठी असतात.

३) प्रदर्शनासाठी व पैदाशीसाठी बोकड तयार करणे : प्रदर्शनासाठी व पैदाशीचे बोकड तयार करणे ही संकल्पना मागील काही वर्षां पासुन सुरू झाली आहे. प्रदर्शनासाठी व पैदाशीचे बोकडे तयार करणे ही खर्चीक बाब असली तरी जसे जर्शी गाय-बैल- म्हैशींची जशी प्रदर्शने असतात तशीच उत्तम शेळ्यांचीही प्रदर्शने भारतात त्यासाठी उत्तम जातिवंत नर व माद्या तयार केल्या जातात त्यांना पारितोषिके मिळाल्यास त्यांच्या किंमती वाढतात तसेच त्यांच्या पासून मिळालेल्या पैदाशीची सुद्धा मागणी वाढते. अशाप्रकारे पारितोषिके मिळालेले नर पंचक्रोशीतील शेळ्या गाभ घालवण्यासाठी वापरतात. हे एक या व्यवसायातील मोठे साधन ठरत आहे.
४) मांस निर्यातीसाठी : शेळ्यांचे मांस अतिशय रुचकर असते. त्यामुळे परदेशात सुद्धा शेळ्यांच्या मांसाला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. स्वच्छ मांस- निर्मिती करून गुणवत्तेच्या नियमांप्रमाणे त्याची निर्यात करून आपण भरघोस फायदा मिळवु शकतो.
५) लेंडीखत निर्मितीसाठी : एक शेळी दिवसाला साधारणतः ६५० ते ७०० ग्रॅम व एक पिल्लू साधारणतः ३०० ते ३५० ग्रॅम लेंडीखत देते. शेतीसाठी या खताला चांगली मागणी असते व किंमत देखील चांगली मिळते. शेळीपालनातून लेंडीखत निर्मिती हे एक उत्पन्नाचे मोठे साधन आहे.
६) दुध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती : शेळीच्या दुधामध्ये ८७ टक्के पाणी, ४.२५ टक्के स्निग्ध पदार्थ (फॅट), ३.२५ टक्के प्रथिने व १३ टक्के एकूण घनपदार्थ असतात. त्याचबरोबर महत्वाची खनिजे पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, क्लोरीन, याचे प्रमाण गायीच्या दुधापेक्षाही जास्त प्रमाणात शेळ्यांच्या दुधामध्ये असते. ज्या व्यक्तींना पचनसंस्थेचे विकार आहेत त्यांच्यासाठी व लहान मुलांसाठी शेळीचे दुध अतिशय उपयुक्त समजले जाते.शेळीच्या दुधापासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांना उदाहरणार्थ पनीर, चीज, दही, दुधापासून बनवलेला साबण (जो त्वचारोगांवर उत्तम ठरू शकतो) यांची शहरांमध्ये मागणी कमालीची वाढत आहे. भविष्यात या उत्पादनांना असलेली मागणी वाढतच जाणार आहे.

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

राहुल दत्तात्रय गलंडे
मोबा.- ९४०५५५०६७१
ई-मेल [email protected]
प्रकल्प समन्वयक/डेअरी प्रशिक्षक
धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी, पुणे

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues