Take a fresh look at your lifestyle.

Onion Disease : कांदा पिकाचे करा योग्य रोग व्यवस्थापन

0

सध्याच्या वातावरणामुळे कांदा पिकामध्ये करपा रोग केवडा व सड या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. त्यांच्या नियंत्रणाचे योग्य वेळी उपाय योजल्यास उत्पादनात चांगली वाढ मिळू शकते.

सध्या कांदा पिकामध्ये जांभळा करपा, काळा करपा आणि तपकिरी करपा असे रोग दिसतात. कांदा सड, केवडा, काजळी, मान सड, पांढरी सड या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. या रोगांच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

जांभळा करपा :
जगभरामध्ये कांदा उत्पादक देशामध्ये या रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येऊन सुमारे ५० ते ७० टक्केपर्यंत पिकाचे नुकसान होते.
लक्षणे : पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्याचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे पाने किंवा फुलांच्या दांड्यावर पडतात. अनेक चट्टे एकमेकात मिसळून पाने करपतात व नंतर वाळतात. झाडाच्या माना मऊ पडतात.
या रोगकारक बुरशीच्या वाढीस १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ८० टक्के आर्द्रता पोषक असते. पाऊस झालेल्या किंवा ढगाळ वातावरणात या रोगाची तीव्रता वाढते. रांगड्या हंगामातील कांद्यावरदेखील या रोगाचा बराच प्रादुर्भाव होतो.

Farmer Production Organization : शेतकरी उत्पादक गट काय आहेत? त्यातून शेतकऱ्यांना काय मदत मिळेल?

उपाययोजना :
थायरम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून रोपाचे स्थानांतरानंतर ३०, ४५ व ६० दिवसांनंतर फवारणी करावी. फवारणीसोबत चिकट द्रवाचा वापर करावा.
नत्रयुक्त खताचा शिफारशीपेक्षा अधिक आणि उशिरा वापर करू नये.
पिकांची फेरपालट करावी.

मर रोग किंवा रोप कोलमडणे :
बी पेरल्यानंतर बुरशीचे तंतुमय धागे कुज किंवा रोपाच्या जमिनीलगतच्या भागात लागण करून रोप कमजोर करतात, त्यामुळे काही वेळा ८० ते ९० टक्केपर्यंत नुकसान होते. या रोगामध्ये
लक्षणे : रोपे पिवळी पडतात. जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडून रोपे कोलमडतात. नंतर सुकतात. कोलमडलेल्या रोपांच्या जमिनीलगतच्या भागांवर पांढरी बुरशी वाढते. पुढील वर्षी कांद्याची रोपवाटिका त्याच भागात केल्यास मर रोगाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
अधिक आर्द्रता व २४ ते ३० अंश सेल्सिअस तापमान या रोगकारक बुरशीच्या वाढीस उपयुक्त ठरते. रोपवाटिकेच्या वाफ्यातून पाण्याचा निचरा लवकर न झाल्यास रोगाची तीव्रता वाढते.
उपाययोजना :
रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
रोपे नेहमी गादी वाफ्यावर तयार करावी. पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.
रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.
एवढे करून रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास, दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी मिसळून ओतावे.
शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

तपकिरी करपा :
या रोगाचा प्रादुर्भाव कांदा पिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होतो.
लक्षणे : पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसू लागतात. चट्ट्याचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. फुलांच्या दांड्यावर हा रोग असल्यास फुलांचे दांडे मऊ होऊन तिथे वाकून मोडतात.
या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रब्बी हंगामात होतो. १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ८० ते ९० टक्के आर्द्रता यामुळे बुरशीची वाढ झपाट्याने होते. पावसाळी किंवा ढगाळ वातावरणात या रोगाचा प्रसार जोरात होतो.
उपाययोजना :
पिकाची फेरपालट, बीजप्रक्रिया, रोपे लावताना मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती १० लिटर प्रमाणे द्रावणाची केलेली प्रक्रिया यामुळे रोगाची तीव्रता कमी करता येते.
रोपाचे स्थानांतरानंतर ३० दिवसांनी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १० मिली किंवा प्रोपिकोनॅझोल १० मिली प्रती १० लिटर या प्रमाणे गरजेनुसार ३ ते ४ फवारण्या कराव्यात.

कुफरी किरण बटाटा: उच्च तापमानातही मिळणार बंपर उत्पादन,शास्त्रज्ञांनी केली बटाट्याची नवीन जात विकसित.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues