Take a fresh look at your lifestyle.

पाईपलाईन करतेवेळी अडवणूक झाली तर ‘हे’ करा!

0

शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मुबलक पाणी लागते. कारण असे असेल तर वेगवेगळे पिक घेता येऊ शकते. मात्र अनेकदा पाण्यासाठी दूर वरून पाईपलाईन टाकावी लागते. अशा वेळी इतर शेतकरी पाईपलाईन अडविण्याचा प्रयत्न करत असतात. अशावेळी नक्की काय करावे? हे सुचत नाही. मात्र हा लेख वाचून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल…

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1967 नुसार याविषयी कायदे बनविले गेले आहेत. जर एखाद्या शेतकरी बांधवाला दुसऱ्या ठिकाणाहून आपल्या शेतात पाणी आणायचे असल्यास संबंधित शेतकऱ्याला तहसीलदारांककडे रीतसर अर्ज करावा लागतो. यासोबत ७/१२ जोडावा लागतो. हा अर्ज मिळाल्यावर तहसीलदार त्यावर कार्यवाही सुरु करतात. नंतर संबंधितांना रीतसर नोटीस काढली जाते. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाते. दरम्यान नेमका कोणत्या कारणामुळे वाद आहे? हे तपासले जाते. मग आवश्यकता लक्षात घेऊन परवानगी द्यायची कि नाही हे? याबाबत ठरविले जाते. हि परवानगी देतांना खालील काही मुद्दे विचारात घेतले जातात.

● असे वाद परस्पर सामंजस्याने मिटविण्याचा प्रयत्न होतो. दोघांनाही मंजूर असेल अशा पद्धतीने परवानगी देण्याचा प्रयत्न होतो.
● सामंजस्याने वाद मिटत नसेल तर कमीत-कमी नुकसान होईल याकडे पाहून परवानगी दिली जाते.
● पाईपलाईन टाकताना मुद्दामहून खोडसाळपणाने इतर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही? हे तपासले जाते.
● पाण्याची पाटाची रुंदी 1.5 मीटर पेक्षा अधिक नसावी.
● पाईपलाईन टाकतांना खोली हि 1/2 मीटर पेक्षा जास्त खोलीवर टाकली पाहिजे.
● पाण्याचे पाट जमिनीवरून वाहत असेल किंवा पाईपलाईन जमिनीच्या पृष्ठ भागावरून असेल तर त्याचे भाडे सबंधित शेतकरी यांना जे ठरेल तसे द्यावे लागते.
● पाईपलाईन टाकल्यानंतर कालांतराने दुरुस्तीची वेळ अली तर सबंधित शेतकऱ्याला स्वखर्चाने ती करावी लागेल. मात्र यावेळी पिकांचे किंवा इतर नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा नुकसान भरपाई द्यावी लागते.
● नुकसानभरपाई दिली नाही तर ती जमीन महसूल म्हणून देखील वसूल केली जाऊ शकते.

अपील करता येते का? : याबाबत आपल्याला तहसीलदारांचा निर्णय जर मान्य नसेल तर त्यांच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची तरतूद नाही. परंतु तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू शकता.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues