Take a fresh look at your lifestyle.

तुमच्या शेतातही सफरचंदाची शेती शक्य आहे? वाचा!

0

इंदापूर तालुक्यातील सणसर गावच्या प्रभाकर खरात यांनी सफरचंदाची शेती करून त्याचं यशस्वीरित्या उत्पादन घेतलं आहे. त्यांच्याकडून पाहून नक्कीच वाटते कि, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. विशेष बाब म्हणजे आपल्या या यशस्वी शेतीचा इतरांना फायदा व्हावा यासाठी उत्तम मार्गदर्शन खरात कुटुंबीय करत आहेत.

प्रभाकर हे मुळचे शिक्षक असून सेवा निवृत्त झाल्यापासून ते शेती करत आहेत. शेतीत एक वेगळा प्रयोग करायचा म्हणून त्यांनी सफरचंदाची लागवड करायचे ठरवले. मग यासाठी त्यांनी दार्जिलिंगहून सफरचंदाची रोपं मागवली. पुढे या रोपांची लागवड करुन अवघ्या 15 ते 19 महिन्यात त्यांनी सफरचंदाचं यशस्वी उत्पादन काढलं. त्यांच्या या प्रयोगाची सध्या जोरदार चर्चा आहे.

सफरचंदाचा अवघ्या 10 गुठ्यांतील यशस्वी प्रयोग केल्यानंतर त्यांनी सिडलेस लिंबू, खायचा बदाम याशिवाय मसाल्याच्या पदार्थासह एकूण 20 ते 25 प्रकारची वेगवेगळी उत्पादने यशस्वीपणे घेतली आहेत. यातून अधिकचा नफाही त्यांना मिळतो आहे, अशी माहिती खरात यांनी दिली आहे.

योग्य नियोजन आणि व्यवस्थापन शेतीत नफा मिळवून देते उत्तम उदाहरण म्हणजे खरात कुटुंब आहे. आपल्या यशस्वी प्रयोगानंतर ते इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहेत.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues