Take a fresh look at your lifestyle.

आता व्यवहारातून ‘हि’ नाणी रद्द होण्याची शक्यता; RBI चा नवा नियम

0

आपल्या सर्वांना माहिती आहे कि, दररोजच्या आर्थिक व्यवहारांमध्ये नोटांसोबतच काही नाणीही वापरली जातात. आतापर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक पैशाच्या नाण्यांपासून अगदी 20 रुपयांपर्यंत नाणी वितरीत केली आहेत. यातील काही नाणी आता चलनामध्ये वापरली जात नाहीत. परंतु या दरम्यानच आता काही नाण्यांबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे असून लवकरच 50 पैसे, 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांची नाणी वैध ठरण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2004च्या परिपत्रकाप्रमाणे आरबीआयनं क्युप्रोनिकेल आणि अॅल्युमिनियमपासून बनवलेली एक रुपया पर्यंतची जुनी नाणी परत घेऊन पुन्हा टांकसाळांकडे वितळवण्यासाठी पाठवण्याची सूचना बँकांना केली होती. भारत सरकारने 25 पैसे आणि त्यापेक्षा कमी किंमतीची नाणी जून 2011च्या अखेरीपासून चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर, ही नाणी कायदेशीररित्या वैध राहिलेली नाहीत.

1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ही नाणी सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय होती. आरबीआयच्या निर्देशांनुसार एकदा बँकेत जमा झालेली ही नाणी पुन्हा जारी केली जाणार नाहीत.

आरबीआयनं व्यवहारातून रद्द केलेली नाणी

▪️ 1 रुपयाची क्युप्रोनिकेल नाणी
▪️ 50 पैशांची क्युप्रोनिकेल नाणी
▪️ 25 पैशांची क्युप्रोनिकेल नाणी
▪️ 10 पैशांची स्टेनलेस स्टीलची नाणी
▪️ 10 पैशांची अॅल्युमिनियम-ब्राँझ नाणी
▪️ 20 पैशांची अॅल्युमिनियम नाणी
▪️ 10 पैशांची अॅल्युमिनियम नाणी
▪️ 5 पैशांची अॅल्युमिनियम नाणी

दरम्यान, आरबीआयच्या गाइडलाइननुसार, जुनी नाणी दैनंदिन वापरातून बाहेर काढली जात आहेत. म्हणजेच बँक ही नाणी तयार करणार नाही आणि वितरित करणार नाही. पण, सध्या व्यवहारात वापरात असलेल्या नाण्यांवर अद्याप बंदी घातलेली नाही. एकदा ही नाणी तुम्ही बँकेत जमा केल्यानंतर ती व्यवहारांसाठी पुन्हा जारी केली जाणार नाहीत. तुम्हाला व्यवहारासाठी नवीन डिझाइनची नाणी दिली जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues