Take a fresh look at your lifestyle.

North Korea : उत्तर कोरियामध्ये चित्रपट पाहणं दोन विद्यार्थ्यांना पडलं चांगलचं महागात; झाली ‘ही’ क्रूर शिक्षा

0

North Korea आपल्या सर्वांनाच माहिती आहे कि जगातील अनेक देश आजही हुकूमशाहीवर चालतात त्यामधीलच एक बहुचर्चित देश म्हणजे उत्तर कोरिया. याच देशातून आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना थेट मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. त्यांची चूक एढीच होती की, त्यांनी दक्षिण कोरियामध्ये बनलेले चित्रपटाचे दोन शो पाहिले होते.

North Korea नेमके प्रकरण काय?

North Korea उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियात सतत तणाव असतो. यामुळेच दक्षिण कोरियात बनलेले शोज, चित्रपट पाहण्यावर उत्तर कोरियात पूर्णपणे बंदी आहे. ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली असून आत्ता डिसेंबरमध्ये या घटनेला वाचा फुटली आहे.

North Koreaही शिक्षा पाहणाऱ्या एकाने सांगितले की, त्याभागातील नागरिकांना ती शिक्षा पाहण्यासाठी सक्ती करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी अधिकाऱ्यांना हेसन शहरात राहणाऱ्या नागरिकांनी एका मोकळ्या मैदानात एकत्र होण्यास सांगितले. तिथे काही अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. किम जोंग उन नेहमीच अजब फर्मान आणि नियमांमुळ चर्चेत असतो. उत्तर कोरियातील नागरिक त्रस्त आहेत, पण हे सर्व सहन करण्याशिवाय तेथील जनतेकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.

हेही वाचा : बापरे! एकीकडे बेरोजगारी संपेना अन् इथे उंदीर पकडण्याचे मिळतात 1 कोटीहून अधिक पगार

North Korea एवढेच नव्हे तर मागील काही दिवसापूर्वी उत्तर कोरियामध्ये नवा आदेश जरी करण्यात आला होता.. या मध्ये देशातील सर्व लहान मुलांची नावं बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाईटच्या नावांवर ठेवण्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, याआधीही 2021 मध्ये दक्षिण कोरियन व्हिडीओ पाहिल्यामुळे सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. हुकूमशाह किम जोंग उन त्याचे विचित्र नियम आणि क्रूरतेसाठी ओळखला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues