Take a fresh look at your lifestyle.

New Year Party नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातील काही बेस्ट ठिकाण

0

सध्या घरोघरी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. अनेक जणांचा थर्टी फस्ट सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या जवळच्या पर्यटनस्थळाकडे जाण्यावर भर असतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणे आहेत जिथे जाऊन तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत आनंदतात करू शकतात..

New Year Party Locations : या वर्षाच्या शेवटी तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता?

मुंबई (Mumbai) : मुंबई शहर सात बेटांवर वसलेले शहर आहे. मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे तसेच महाराष्ट्राचा सर्व राजकीय कारभार मुंबईमधून पाहिला जातो. या वर्षाच्या शेवटी तुम्ही मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मारिन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, यांसारख्या अनेक ठिकाणी जाऊन आपला आनंद व्यक्त करू शकता.

माथेरान (Matheran) : माथेरान भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. रायगड जिल्ह्यात असलेल्या कर्जत तालुक्यातील हे ठिकाण पर्यटकांच आकर्षण बनलेलं आहे. माथेरान हे मुंबई आणि पुण्यापासून जवळपास 85 ते 110 किलोमीटर असल्यामूळे शहरातील लोक सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी इथे येत असतात.

लोणावळा (Lonavala) : लोणावळा हे एक पुणे जिल्ह्यातील व सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत असलेलं पर्यटन स्थळ आहे. हे एक महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातचं नव्हे तर संपुर्ण भारतात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्याहून लोणावळा 63 किलोमीटर इतके आहे. आणि मुंबईहून याचे अंतर 96 किलोमीटर आहे

लोणार सरोवर (Lonar Sarovar) : बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या लोणार सरोवराची निर्मीती नैसर्गिक घटनेमूळे म्हणजेच उल्कापातामूळे झालेली आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून लोणार सरोवर प्रसिद्ध आहे. येथे बेसाॅल्ट खडक आढळतो. सुट्टीच्या दिवशी अनेक लोक या ठिकाणी येतात.

भंडारदरा (Akole Bhandardara Dam) : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर सज्ज झाला आहे. भंडारदऱ्यामध्ये टेन्ट सिटीसह बोटिंगची व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे. तर आलेल्या पर्यटकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी वनविभाग देखील सज्ज झाला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या पर्यटकांना या ठिकाणी आदिवासी नृत्याचाही आनंद घेता येईल.

IPhone In India : कधी विचार केलाय का, भारतात Iphones महाग का? ही आहेत कारणे

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues