Take a fresh look at your lifestyle.

आता नव्या फॉरमॅटमध्ये सातबाराचा उतारा मिळणार

0

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेला सातबारा आता नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी सातबारा ऑनलाईन मिळत आहे. मात्र आता त्यातही पुन्हा नव्या फॉरमॅटमध्ये हा सातबाराचा उतारा मिळणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच केली आहे.

यावेळी बोलताना थोरात म्हणाले, आता सातबारा ऑनलाईन केला असून तो नव्या फॉरमॅटमध्ये मिळणार आहे. त्यासाठी खूप काम करावं लागलं आहे. मिळकत पत्रिका सुद्धा पूर्ण होत आली आहेत. लवकरच चार ठिकाणी जमिनी असतील तर एकच सातबारा मिळेल. 2008 पासूनचे फेरफार सुद्धा डिजिटल रूपात मिळणार असल्याने तलाठ्यांचा वेळही वाचणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2020 | पैसे न आल्यास कुठे तक्रार करावी

आता जमिनीच्या खोट्या नोंदी शक्य नाही!

▪️ सात बारा काढण्यासाठी अवघी 15 रुपये रक्कम मोजावी लागेल.
▪️ बँकांसोबत करार केला जाणार आहे. बँक देखील सात बारा काढू शकतील.
▪️ आता खोट्या नोंदी करता येणार नाही.
▪️ तसेच फोटो आणि लोकेशन मिळेल.
▪️ कोणताही गैरप्रकार होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल.

शेतकरी स्वतः नोंदणी करू शकतील : ई पीक पाहणी सुरू असून स्वतःच शेतकरी नोंद करू शकणार आहेत. त्याबाबत तलाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. यासाठी टाटा ट्रस्टने मदत केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण यामुळे पिकांची लागवड, विमा कवच, अनुदान आणि कर्जाची माहिती देखील सहज मिळणार आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.