Take a fresh look at your lifestyle.

kisan diwas …म्हणून आजच्या दिवशी राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो!!

0

आज देशाचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांच्या जन्मदिनी आज सर्वत्र भारतामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmer’s Day) अर्थात किसान दिवस म्हणून साजरा केला जातो.

23 डिसेंबर (23 december kisan diwas) हा चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस त्यामुळे आजच्या दिवशी शेतकर्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत देशात सर्व बळीराजाला धन्यवाद म्हटलं जातं.

दरम्यान, अटल बिहारी वाजापेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी त्यांनी भारत 2020 मध्ये महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता.

मात्र, दुसरीकडे देशातील शेतकरी आता हवालदिल झाला आहे. देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतो. परंतु, याच देशात सध्या शेतकरी सरकारी सुविधांपासून वंचित आहे. सरकारने शेतीमालाला योग्य हमीभाव देणं, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणं गरजेचं आहे. आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या. जेणे करून त्यांनाही शेतकरी असण्याचा अभिमान वाटेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues