Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अळंबीची शेती करा महिन्याला पाच लाख रुपये कमवा!

0

सध्या पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणी वाढत चालली आहे. हाच विचार करता अळंबी किंवा मशरुमची शेतीचा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा कमवून देऊ शकतो..

मशरूम पौष्टिक, औषधी आहे तसेच निर्यातीसाठी देखील महत्त्वाचे आहे. आत्तापर्यंत या शेतीच्या माध्यमातून अनेकांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या मशरूमला रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये देखील मोठी मागणी असते. चला, तर या शेतीबाबत अधिक जाणून घेऊयात…

मशरूम शेतीसाठी लागवडीच्या तंत्राकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. प्रति चौरस मीटर 10 किलो मशरूमचे उत्पादन घेता येते. किमान 40×30 फूट जागेत 3-3 फूट रुंद रॅक बनवून मशरूम वाढवू शकता. विशेष म्हणजे सरकारी अनुदानाच्या मदतीने हा व्यवसाय सुरू करू शकता.

अळंबीसाठी वापरण्यात येणारा पेंढा शेतातील भातकापणी झाल्यानंतर उपलब्ध होतो. अळंबीचे उत्पन्न घेतल्यानंतर उरलेला चोथा हा खत म्हणून शेतात वापरता येतो. यामुळेच अळंबी लागवड शेतीला पूरक व्यवसाय मानला जातो.

सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांमध्ये मशरूम लागवडीचे प्रशिक्षण दिले जाते. जर तुम्ही त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा विचार करत असाल तर एकदा ते योग्यरित्या प्रशिक्षित करणे चांगले.

कमाई किती होईल? : प्रगत तंत्रज्ञानाने सुरुवात केलीत तर तुम्ही सुरुवातीपासूनच लाखोंची कमाई करू शकता. जर तुम्ही 100 चौरस फूट क्षेत्रामध्ये अळंबीची शेती सुरु केली तर वर्षाकाठी तुम्हाला 1 लाख ते 5 लाख रुपयांचा नफा मिळू शकतो.

बाजारपेठेत मोठी मागणी :

● मशरुमचे बटन आणि शिंपला\धिंगरी मशरुम हे दोन प्रकार आहे.
● धिंगरीची लागवड बटनपेक्षा कमी खार्चिक आहे.
● मशरुम हे पचनक्रियेसाठी चांगेल असून त्यामध्ये विविध औषधी गुणधर्मही आहेत.
● सध्या मशरुमपासून लोणची, पापड, सूप, हेल्थ पावडर, कॅप्सूल आणि हेल्थ ड्रिंक इत्याही उत्पादने बनवण्याचे प्रमाण वाढटच चालले आहे.
● घाऊक बाजारात मशरुमला प्रतिकिलो 50 ते 100 रुपये एवढा भाव आहे.
● सध्या भारतातील अनेक शहरांमधून मशरुम परदेशात निर्यात देखील केले जाते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews