Take a fresh look at your lifestyle.

Mood of Nation Survey : शिंदे-फडणवीस सरकारचे टेन्शन वाढले; मूड ऑफ नेशनची धक्कादायक अहवाल समोर

0

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची तयारी सुरू असताना सत्ताधारी शिंदे – फडणवीस सरकारसाठी (shinde fadnavis government) एक धक्कादायक अहवाल समोर आली आहे. इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी मूड ऑफ नेशन (Mood of Nation Survey) अंतर्गत घेण्यात आलेल्या एकूण 01 लाख 40 हजार 917 लोकांचा सर्व्हेमधून हि बातमी समोर आली आहे.

मूड ऑफ नेशनच्या सर्व्हमध्ये नेमके काय?

या सर्व्हेमध्ये सर्वसामान्य जनतेला काही प्रश्न विचारण्यात आले होते. उदा. आज लोकसभेची निवडणूक झाल्यास कोणाची सत्ता येईल? या सोबतच सध्याच्या मोदी सरकारबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते.

सर्व्हमध्ये जनतेचे मत काय?

सर्व्हेतील प्रश्नाचे उत्तर देतांना सर्वसामान्य जनतेत म्हंटले आहे कि.. देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार येईल. मोदी सरकार 9 वर्ष सत्तेत आहे आणि 67 टक्के लोकांनी त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ता ऑगस्ट 2022मध्ये झालेल्या सर्व्हेच्या तुलनेत या आकडेवारीत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये 37 टक्के लोक मोदी सरकारच्या कामकाजावर नाराज होते. आता हे प्रमाण 18 टक्क्यांनी घटले आहे. एवढेच नव्हे तर लोकसभेच्या 543 जागांपैकी एनडीएला 298 जागा मिळतील असे म्हटले आहे. तर युपीएला 153 जागा मिळू शकतात.

या सर्व्हत महाराष्ट्रातील निकाल धक्कादायक :

राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. तर विरोधी पक्षात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी आहे. अशात राज्यात आता लोकसभेची निवडणूक झाल्यास युपीएला (महाविकास आघाडीला) 34 जागांवर विजय मिळेल असे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. 2019च्या लोकसभेत त्यांना फक्त 6 जागा मिळाल्या होत्या.

दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर भाजप अधिक सक्रिय आणि अक्रमक झाला असून त्यांनी राज्यात मिशन 45 ची घोषणा दिली होती. पण ‘मूड ऑफ नेशन’मध्ये मात्र युपीएला 48 पैकी 34 जागा मिळतील असे म्हटले आहे. याचा अर्थ एनडीएला फक्त 14 जागा मिळतील. ‘मूड ऑफ नेशन’च्या या सर्व्हेमुळे भाजप आणि शिंदे सरकारचे टेन्शन वाढले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राप्रमाणेच युपीएला कर्नाटक आणि बिहारमध्ये मोठा फायदा होऊ शकतो असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues