Take a fresh look at your lifestyle.

Monsoon Update : IMD कडून अलर्ट जारी; पुढचे 2 ते 3 दिवस काय असेल पावसाची स्थिती जाणून घ्या

0

Monsoon Update जुलै महिन्याच्या सुरवातीपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अद्यापही राज्यातील काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. अशातच भारतीय हवामान खात्यानं येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Monsoon Update सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. अशातच राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मात्र या दरम्यान, मुंबई ठाणे भागात तीव्र हवामानाचे इशारे नाहीत.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.