Take a fresh look at your lifestyle.

राज्यात लवकरच मान्सूनचे पुनरागमन? शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

0

जून महिन्यात राज्यात मान्सूनचे आगमन झाले आणि मुसळधार पावसाने हजेरी देखील लावली. यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली. मात्र त्यानंतर बराच लांबलेला मान्सून आठवड्याभराने पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.

हवामान विभागाने वर्तवलेली शक्यता पाहता चालू आठवड्यात आठ ते नऊ जुलै दरम्यान पावसाचे पुनरागमन होईल, अशी अपेक्षा आहे. माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व पूर्व विदर्भ या भागांमध्ये 7 व 8 तारखेला ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊसाची हजेरी लावेल.

शेतकरी बांधवांनी पावसाचा अंदाज घेत पेरणी करावी असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. वैज्ञानिक व मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली.

——————

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.