Take a fresh look at your lifestyle.

Monsoon in maharashtra ‘या’ तारखेनंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा करणार बॅटिंग

0

Monsoon in maharashtra गेल्या पंधरवड्यापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच सर्व सामान्यांचेही चांगलेच हाल झाले आहे.

Monsoon in maharashtra मागील काही दिवसांपासून वरूणराजाने जराशी उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अरबी समुद्रातील उत्तर पूर्व भागापासून ते सौराष्ट्र, कच्छच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.

Monsoon in maharashtra मान्सून 21 जुलैनंतर करणार जोरदार बॅटिंग :

या पट्ट्याचे रूपांतर 24 तासांत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता असल्याने 21 जुलैनंतर पुन्हा राज्यात विशेषत: कोकणात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जुलै महिन्याची सरासरी राज्याने ओलांडली आहे.

Monsoon in maharashtra ३-४ दिवस पावसाचा जोर कमी :

पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. तरीदेखील 19 जुलैपर्यंत काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. दरम्यान, गुजरातची किनारपट्टी ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.