Take a fresh look at your lifestyle.

राज्यात आगामी 5 दिवस पाऊस कसा असेल? जाणून घ्या!

0

सध्या ऑगस्टमध्ये मान्सूनने राज्याच्या बहुतांश भागात विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरीप हंगाम अडचणीत सापडला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील आठवड्यात राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

यंदाच्या मान्सूनचे वैशिष्टय पहिले तर कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस, सातत्याने पडणारा खंड आणि असमान वातावरण. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. मात्र आता हंगामाच्या शेवटच्या कालावधीत चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

पुढील दोन आठवड्यात पाऊस कसा असेल? हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

दुसऱ्या आठवड्यात ३ ते ९ सप्टेंबर या दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता 51 ते 75 टक्के असू शकते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues