Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचं आगमन

1

महाराष्ट्रात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचं आगमन

तौक्ते चक्रीवादळानंतर आता मान्सून दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमान बेटावर दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) दिली आहे. त्यामुळे लवकरच मुख्य भूभागात मान्सून पोहोचण्याचे संकेत दिले आहेत.

आयएमडीने सांगितले की, ‘21 मे रोजी नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, निकोबार बेटे, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून आला आहे.’ 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी आयएमडीने वर्तवला होता. पण आता अंदमान-निकोबारमध्ये मान्सून पोहोचला असल्यामुळे केरळमध्ये मान्सून 1 जून अगोदरच म्हणजेच 31 मे दाखल होण्याचा अंदाज आता भारतीय मौसम विज्ञान विभागाने व्यक्त केला आहे.

अंदमानाच्या समुद्रात साधारणः 20 ते 21 मे दरम्यान मौसमी वाऱ्याचे आगमन होत असते. त्यानंतर केरळ किनारपट्टीला मौसमी वारे धडकतात. मात्र तोक्ते चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल का? असे प्रश्न उपस्थितीत होत होते. परंतु हवामान खात्याच्या अंदाजाने काही दिवसांपूर्वी या प्रश्नाला उत्तर दिले आहे. मान्सून नेहमीच्या वेळेप्रमाणे अंदमानात दाखल होणार आणि आज तो अंदमान-निकोबारच्या काही बेटावर दाखल झाला आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 10 जूनपर्यंत तळकोकणात दाखल होऊ शकतो आणि उर्वरित महाराष्ट्रात 15 ते 20 जूनदरम्यान पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

1 Comment
  1. NITIN RAMHARI PISAL says

    Very nice website

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues