Take a fresh look at your lifestyle.

सिताफळ बागेचे बहार व्यवस्थापन कसे करायचे? वाचा!

0

जर आपल्याकडे सीताफळ बाग आहे. तर आपल्यासाठी हा लेख म्हणजे ‘सोने पे सुहागा’. मात्र जरी बाग नसेल तर ही माहिती तुमच्या ज्ञानात भर घालेल एवढं नक्की!

सर्वप्रथम बहार धरणे म्हणजे काय? ते समजावून घेऊ. बहार धरणे हे जमिनीच्या प्रकारानुसार आणि तिच्या मगदुरानुसार बागेचे पाणी बंद करून बागेला ताण देणे, बागेची छाटणी व मशागत करून नंतर पाणी व खते देणे होय.

उन्हाळी बागेचे व्यवस्थापन करत असाल तर बहार घेण्यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी बंद करणे आवश्यक ठरते. दरम्यान जमिनीत किमान 40 ते 45 दिवस बागेचे पाणी बंद करा. या मधल्या काळात जुनी पाने पूर्णपणे गळून नवीन पाने येण्याचा काळ असतो. तेव्हाच बागेची छाटणी करून घ्या.

झाडाला आकार देताना पहिली दोन वर्षे महत्त्वाची : सिताफळ लागवडी करता असताना झाडांना आकार देणे सर्वात महत्वाची बाब आहे. सीताफळाची रोपे लावल्यानंतर साधारणतः दीड ते दोन फुटापर्यंत एकच खोड ठेवा. त्यानंतर प्रत्येक दीड ते दोन फुटावर तिचा शेंडा मारून एका फुटीच्या 2, दोन फुटी चार खांद्या अशाप्रकारे फुटींची संख्या वाढवून झाड डेरेदार वाढवा. सिंगल फूट दोन फुटाचे पुढे जाणार नाही याची किमान दोन वर्षे काळजी घ्या.

झाडाला आधार द्या : सीताफळाची लागवड करताना सीताफळाच्या रूपाला बांबूच्या काठीचा आधार देऊन खोड बांधून घ्या. खोड बांबूला बांधत असताना प्लास्टिकचा रुंद पट्टीने बांधा. जेणेकरून खोडामध्ये बांधलेली दोरी रुतणार नाही. सुरुवातीलाच खिवड सरळ राहील याची काळजी घ्या. अन्यथा इतर अडचणींमुळे खोड ईशान्य बाजूला दुखते आणि दक्षिणायन चालू असताना 90 अंशांच्या कोनामध्ये सूर्याची किरण जास्त वेळ राहिल्यामुळे खोडावरील साल जळते.

अशी करा बागेची बहार छाटणी : उत्तम गुणवत्तेची फळे मिळावी याकारिता किमान दोन वर्षानंतर बहाराची छाटणी करा. हे करताना खोडावरील दोन फुटापर्यंत फुटी आणि वॉटर शूट काढा. वाळलेल्या रोगट, दाटी करणाऱ्या फांद्यांचा शेंडा मारा, बारीक फांद्या काढा, फुले आल्यानंतर येणारी नवीन फूट काढा. जेणेकरून झाडाच्या मधल्या भागात पुरेपूर सूर्यप्रकाश मिळेल. सीताफळाच्या झाडाला जोरकस वारा असेल तर प्रत्येक दीड ते दोन फूटला फुटीचा शेंडा मारा. ही बाब आपोआप फूट थांबेपर्यंत करत रहा.

असे केल्याने झाड डेरेदार होऊन पसरते. फळांची वाढ चांगली होते. छाटणी करताना पेन्सिल आकारापेक्षा मोठ्या काड्या काढल्यास फळांची संख्या कमी मिळते. मात्र फळांचा आकार त्यामानाने मोठा मिळतो. तर पेन्सिल आकारापेक्षा लहान कड्या ठेवल्यास फळांची संख्या त्या मानाने जास्त मिळते मात्र फळांचा आकार लहान राहतो.

बागेला पाण्याचा ताण द्या : या बागेला पानगळीच्या काळात पाणी देणे पूर्ण बंद करा. जातीनुसार पानगळीचा काळ कमी अधिक कसाही असू असतो. लक्षात घ्या, झाडाला परिपूर्ण विश्रांती देणे आवश्यक असते. विश्रांतीच्या काळात छाटणी व मशागत व आकार देणे ही कामे करून घ्यावी. अशाने झाडाला भरपूर फुलधारणा होते.

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues