Take a fresh look at your lifestyle.

लाल रंगाची भेंडी करा; मिळतेय 10 पट अधिक किंमत!

0

भोपाळच्या शेतकऱ्याच्या शेतातील अनोखी आणि स्वादिष्ट लाल भेंडी शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरलीय. त्याचे झाले असे कि, शेतकरी मिश्रीलाल राजपूत यांनी बनारस येथील भारतीय भाजीपाला संशोधन केंद्राला भेट दिली होती. यावेळी त्यांना लाल भेंडीबाबत माहिती मिळाली. तेथून त्यांनी 1 किलो लाल भेंडी बियाणे आणले. यासाठी सुमारे 2400 रुपये मोजले.

यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावलेले हे बियाणे आता पीकले आहे. कापणीनंतर जवळच्या शेतकऱ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय ठरत होता. कारण त्यांनी लाल रंगाच्या भेंडीचे पीक पहिल्यांदाच पाहिले आहे.

मिश्रीलाल राजपूत यांनी सांगितले की, सामान्य बाजारात विकणारे हे पीक नाही. कारण त्याला मागणीच नाही. दुसृकडे पोषण आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही भेंडी मोठ्या मॉलमध्ये सहज विकली जाईल. बाजारात त्याची किंमत 350 ते 400 रुपये प्रति किलो आहे.

लाल भेंडी नक्की कशी असते? :
● या पिकात डास, सुरवंट आणि इतर कीटक नसतात. याचे कारण त्याचा रंग लाल आहे.
● हिरव्या भाज्यांमध्ये असणारे क्लोरोफिल कीटकांना आवडते. मात्र या लाल रंगमुळे किड्याला ती भेंडी आवडत नाही.
● यात अँथोसायनिन नावाचा एक विशेष घटक आढळतो, जो गर्भवती महिला, मुलांचा मानसिक विकास आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे.
● हि भेंडी हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
● या भेंडीचे पीक 45 ते 50 दिवसात तयार होते.
● 1 एकरात साधारणपणे 40 ते 50 क्विंटल उत्पादन होते. हवामान अनुकूल असेल तर हे पीक 80 क्विंटलपर्यंत जाते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues