Take a fresh look at your lifestyle.

Union Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळात पुढील काही दिवसात मोठे फेरबदल होण्याची शक्यता; शिंदे गटाला अच्छे दिन येणार…

0

मोदी सरकार चे दुसऱ्या टर्मची 4 वर्षे पूर्ण होत असताना, मकर संक्रांति नंतर, केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) फेरबदल होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विविध मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून ,काही बड्या नेत्यांना डच्चू मिळणार असं समजते. तर तसेच युवा आणि काही प्रादेशिक पातळीवरील नेत्यांना तिथल्या राजकीय समीकरणांनुसार मंत्री पदाची खुर्ची मिळण्याची शक्यता आहे. (Union Cabinet reshuffle soon)

एवढेच नव्हे तर राज्यातील सत्ता पालट झाल्यानंतर ठाकरे गटातील 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्याने केंद्रातही शिंदे गटातील खासदारांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

फेरबदलाचे नेमके कारण काय?

  • आजवर अनेकदा फेरबदलाआधी भाजपाकडून, प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. लोकसंपर्क, केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची काम, कार्यकर्त्यांच्या कामाचा निपटारा, पक्ष वाढीसाठी केलेली कामे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाद किंवा भ्रष्टाचाराचे आक्षेप झाले आहेत का याची पाहणी होते.
  • या सर्वाचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला मिळाला असून आता त्यावर कार्यवाही होणार हे निश्चित करण्यात आले आहे. आरएसएसच्या नेतृत्वाला, याबाबत कल्पना देऊन त्यांना राजी केल्याचे समजते.
  • त्यानुसार काही बड्या नेत्यांची विकेट उडणार, असे खात्रीलायक वृत्त असल्याचे सांगण्यात येते आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 जानेवारी पूर्वी होणार केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर याबाबत 16 आणि 17 जानेवारी रोजी भाजप कार्यकारिणीची नवी दिल्लीत बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मोदी, शाह यांच्याकडून कुणाचा पत्ता कट ? कुणाला नवी संधी याची जोरदार चर्चा दिल्ली दरबारी रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues