Take a fresh look at your lifestyle.

Political News : तारीख पे तारीख..!! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा एकदा लांबणीवर

0

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मागील काही महिन्यांपासून चर्चात असलेल्या शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) सुनावणी होणार होती. मात्र, सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार असायची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.

शिवसेनेतील निष्ठावान समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी पक्षाविरोधात बंड केला आणि बघता बघता अनेक आमदार, खासदार आणि नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या गटात सामील झाले. त्यानंतर राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात सत्तापालट झाला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासूनच सर्वोच्च न्यायालयात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे.

दरम्यान, या आधी देखील अनेकदा तारीख पे तारीख चा अनुभव आला होता. त्यानंतर आज काहीतरी ठोस निर्णय दिला जाईल असं वाटलं होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या सत्तासंगर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून सलग घेतली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues