Take a fresh look at your lifestyle.

यंदा या जिल्ह्यात होणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा; असा आहे महाराष्ट्र केसरीचा इतिहास

0

महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही महाराष्ट्रातील अनेक कुस्तीपटू, मल्लांसाठी आणि कुस्तीशौकिनांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय असतो. यंदा ही कुस्ती स्पर्धा नववर्षाच्या सुरवातीला खेळवली जाणार आहे. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा अनेक वाद विवादांतर अखेर पुणे जिल्ह्यात होणार असून ही स्पर्धा 11 ते 15 जानेवारी 2023 दरम्यान कोथरूडमधील मैदानात खेळवली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यात आता बलाढ्य पैलवानांचा पुन्हा एकदा आपला शड्डू घुमणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणांहून आपल्या जिल्ह्यात स्पर्धा आयोजनाची मागणी होती; परंतु सर्व बाजूंनी विचार करता अहमदनगर नंतर आता अखेरीस पुणे येथे आयोजित करण्याचे ठरले आहे. याबाबत माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.. परंतु, आजही अनेक लोकांना माहिती नसेल कि महाराष्ट्र केसरीची सुरुवात कधी पासून झाले काय आहे याचा इतिहास..

कशी असते महाराष्ट्र केसरीची गदा :
महाराष्ट्र केसरी गदा गेल्या तीन दशकापेक्षाही जास्त कालावधी पासून श्री. प्रदीप प्रतापराव पानगरी हे करीत आहेत. नक्षीकाम व मानपत्रे करणारी पानगरीची ही सातवी पिढी आहे जी महाराष्ट्र केसरीची गदा बनवण्याचे काम करते आहे.

गदेची उंची- 27 ते 30 इंच
व्यास- 9 ते 10 इंच
वजन- 8 ते 10 किलो

महाराष्ट्र केसरी गदेबाबत बोलायचे झाले तर, या गदेचा अंतर्गत भाग लाकडी असून यावरती चांदीचे कोरीव नक्षीकाम केले जाते. प्रामुख्याने 28 गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो तर गदेच्या मध्यभागी एका बाजूला स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूस कुस्तीचे दैवत हनुमानाचे छायाचित्रे असते.

दरम्यान. मागच्या वर्षी ही स्पर्धा साताऱ्यात पार पडली होती. कोरोनानंतर दोन वर्षांनी ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या जल्लोषात ही स्पर्धा पार पडली होती. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता.

हेही वाचा : बैलगाडा शर्यतीचं महाराष्ट्रात इतकं वेड का? जाणून घ्या याबाबत रंजक कहाणी

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues