Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Kesari : लाल मातीत आजपासून रंगणार ‘चांदीच्या गदेसाठी’ तगडी स्पर्धा!!

0

आजपासून पुन्हा एकदा लाल मातीत पैलवान शड्डू ठोकणार आहेत. महाराष्ट्रातील कुस्तीपटूंसाठी एक योग्य व्यासपीठ असलेली प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आजपासून पुण्यातील कोथरूड येथे रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत राज्यातून 900हुन अधिक पैलवान सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकीकडे या स्पर्धेला घेऊन अनेक वाद सुरु असतांना पण महाराष्ट्रातील कुस्ती प्रेमी आणि धाकड कुस्तीपटू या स्पर्धेसाठी तितकेच उत्सुकही आहेत. यंदाच्या मानाच्या गदेवर कोण आपलं नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हि स्पर्धा 10 ते 14 जानेवारीदरम्यान पार पडणार आहे.

कधी सुरु होणार हि स्पर्धा :

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

महाराष्ट्र केसरी झाल्यास काय मिळणार बक्षीस :

आपल्या सर्वांना माहिती आहे कि महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्या पैलवानाला चांदीची गदा देण्याची प्रथा 1961 पासून सुरु असून हि गदा राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांच्या वतीने देण्यात येते. तर यंदा चांदीच्या गदेसोबतच 14 लाखांची महिंद्रा थार जीप व 5 लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, यंदाची ही कुस्ती स्पर्धा अधिक ऐतिहासिक आणि अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत. याच कारण म्हणजे या स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, बाळा रफिक शेख अशा माजी विजेत्यांसह इतर जिल्ह्यांतील मल्ल मोठ्या ताकदीने या स्पर्धेत उतणार आहेत.

यंदा या जिल्ह्यात होणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा; असा आहे महाराष्ट्र केसरीचा इतिहास

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues