Take a fresh look at your lifestyle.

Governor resigns : राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राज्यपाल राजीनामा देण्याची शक्यता

0

भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन दूर करावं, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांनी रान उठवलं होतं. त्यातच आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी लवकरच राजीनामा देणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे..

नेमके प्रकरण काय?

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. महाराष्ट्रातील मराठी माणूस, महापुरुषांचा अपमान यांसारख्या विविध मुद्द्यांवर राज्यपालांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. राज्यपालांविरोधात राज्याच्या विविध जिल्ह्यात त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं.

त्यानंतर नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली.

दरम्यान, आता राज्यपालांना पदमुक्त केलं जाणार का हे पाहावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues