Take a fresh look at your lifestyle.

पौष्टिक चाऱ्यासाठी पर्याय शोधताय? मग लसूणघास लागवड कराच!

0

जनावरांना पौष्टिक चारा असला कि, शेतकरी अनेक चिंतेतून मुक्त होतो. म्हणूणच आम्ही तुमच्यासाठी पौष्टिक चारा पर्याय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे लसूणघास.

लसूणघास चारा म्हणजे चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये. हे पीक सतत वर्षभर चारा देत असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्या. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करा.

हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी एक महत्त्वाचे पीक आहे. लसूणघास चाऱ्याचा विचार केला तर यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के काष्ठमय तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले तसेच अ आणि ड जीवनसत्त्व अगदी मोठ्या प्रमाणात आहेत.

जमीन व हवामान : हे पीक वेगवेगळ्या जमिनीत घेत येते. अगदी मध्यम प्रतीच्या, वाळू मिश्रित, पोयटायुक्त जमिनीपासून ते काळ्या कसदार जमिनीपर्यंतच्या भिन्न प्रकारात याची लागवड होते. या पिकास भारी जमीन उपयुक्त तर निचरायुकत जमीन गरजेची ठरते. मात्र अल्काधर्मी जमिनी या पिकासाठी मात्र अयोग्य ठरते. कारण या जमिनीत बियाची उगवणक्षमता एकसारखी होत नाही. त्यामुळे कालांतराने उत्पादनात घटण्याचा संभव असतो. हे पीक विभिन्न प्रकारच्या हवामानात येते. तसेच ते उबदार व थंड हवामानाच्या परदेशीतही चांगल्याप्रकारे लागवडीखाली आणता येते. थंड व कोरड्या हवामानाच्या भागात लसूणघासाचे पीक-कमी जास्त प्रमाणात वाढीस लागते.

पूर्व मशागत : एकदा पेरणी केली कि, त्यानंतर हे पीक त्याच जमिनीत ३ ते ४ वर्षे राहते. त्यामुळे पूर्व मशागतीला फार महत्त्व आहे. त्यासाठी खोलवर नांगरट करून ढेकळांचे प्रमाण अधिक असल्यास ती फोडून घेऊन उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या द्या. बी पेरणीपूर्वी मध्यम ते हलक्या जमिनीत एकरी ८ ते १० टन पूर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० किलो द्या. जर जमीन भारी असेल तर कल्पतरू सेंद्रिय खत ५० ते ७५ किलो द्या. शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास कल्पतरू सेंद्रिय खताची १ ते २ बॅगा जमिनीच्या प्रकारानुसार ज्यादा द्या.

अशी करा बीजप्रक्रिया : हे बी निवडताना भेसळ नसणारे, न फुटलेले, टपोरे, रोगमुक्त निवडा. त्यानंतर १ लि. पाण्यामध्ये २५ -३० मिली जर्मिनेटर घेऊन त्या द्रावणात १ किलो बी ४ ते ५ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरा.

या पिकाबद्दल बोलायचे झाले तर ते वार्षिक आणि बहुवार्षिक असे दोन्ही पद्धतीमध्ये घेतले जाते. याची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत केला तर अधिक फायदा होतो. एकरी सर्वसाधारणपणे ८ ते १० किलो बी पुरेसे असते. मात्र वरील पद्धतीने बीजप्रक्रिया केल्यास बियाण्यामध्ये अजून बचत होते.

‘या’ आहेत सुधारित जाती : यात सिरसा -९ स्थानिक, पुन -१ बी, ल्युसर्न – ९ , आर. एल. -८८, आनंद -२, आनंद -३ जातींची शिफारस केली जाते.

खते : चांगले उत्पादन हवे असेल तर पेरणीपूर्वी वर सांगितल्याप्रमाणे खताचा वापर असू द्या. नंतर पहिल्या कापणी झाली कि, दर कापणीस २० ते २५ किलो कल्पतरू सेंद्रिय खताचा प्रति एकरी वापर करा. म्हणजे कापणीनंतर निघणार्‍या फुटव्यांची वाढ जोमाने होईल. लसूणघासाच्या मुळावर नत्रस्थिरीकरणाच्या गाठी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वेगळी नत्राची मात्रा देण्याची गरज नसते. दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पालाश युक्त सेंद्रिय खत ४० किलो किंवा कल्पतरू सेंद्रिय खताची ५० किलोची १ बॅग एकरी द्या. म्हणजे लसूणघासाचे उत्पादन वाढून जमिनीचा पोत सुपीक राहण्यास मदत होईल.

पाणी पुरवठा : हे वर्षभर हिरवा चारा पुरविणारे पीक असल्याने पाणी पुरविण्याची सोय वेळच्या वेळी करा. याला साधारणपणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्या. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, तर हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी पाणी द्या.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

लसूणघासाची कमी कालावधीत अधिक वाढ होण्यासाठी खालील फवारण्या द्या.

पहिली फवारणी : (लसूणघास उगवून आल्यानंतर ८-१० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २०० मिली. + क्रॉंपशाईनर २०० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + १०० लि.पाणी.

दुसरी फवारणी : (उगवणीनंतर १८ ते २१ दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ४०० मिली. + क्रॉंपशाईनर ४०० मिली. + राईपनर १५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.

तिसरी फवारणी : (उगवणीनंतर २८ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली.+ प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.

वरील प्रमाणे फवारणी केल्याने पाने रुंद, हिरवीगार, लुसलुशीत होऊन लसूणघासाची काडी मऊ, रसदार पौष्टिक तयार होतात. असा घासा दुभत्या जनावरांना खाण्यास दिला तर दुधाचे प्रमाण वाढते.

हे पीक प्रथम कापणीस साधारणपणे ४५ ते ५० दिवसात येते. फुलोऱ्यात येण्यापुर्वीच लसूण घासाची कापणी करा. त्यानंतर वरील दुसरी फवारणी कापणीनंतर ८ दिवसांनी आणि तिसरी फवारणी कापणीनंतर १५ दिवसांनी नियमित केल्यास १८ ते २२ दिवसात कापणीयोग्य घास प्रत्येक वेळी तयार होतो.

उत्पन्न : याचे वार्षिक एकरी उत्पादन ४० ते ५० टनच्या आसपास मिळते व औषधांचा व खतांचा वापर वरीलप्रमाणे नियमित केल्यास उत्पादनात यापेक्षाही वाढ होते. यामुळे सातत्याने पौष्टिक, हिरवागार चार मुबलक व जास्तीत जास्त प्रमाणात मिळतो बरं.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues