Take a fresh look at your lifestyle.

Loan Interest Rate : कर्जदारांना ‘जोर का झटका’! देशातील सर्वात मोठ्या बँकेचं कर्ज महागले

0

Loan Interest Rate तुम्ही जर भारतातील सर्वात मोठ्या बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर हि बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची. कारण SBI ने आजपासून MCLR वाढवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे तुम्ही जर बँकेकडून वाहन, गृह, किंवा शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर तुम्हाला व्याजदरवाढीचा मोठा धक्का बसणार आहे. कारण स्टेट बँकेने आजच (MCLR)मध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीचा परिणाम म्हणून SBI च्या ग्राहकांना कर्जावर पूर्वीपेक्षा जास्त हप्ता (EMI) भरावा लागणार आहे. याबाबत एसबीआयचे नवीन दर लवकरच लागू होतील.

Loan Interest Rate एवढेच नव्हे तर SBI चा रेपो रेट वाढून आता 6.25% झाला आहे. तर मे महिन्यापासून आरबीआयने रेपो दरात 2. 25 टक्के वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, एक ते तीन महिन्यांचा एमसीएलआर 7.75% वरून 8% करण्यात आला आहे.

दरम्यान, रेपो दरात वाढ झाल्यामुळे आरबीआयकडून बँकांना देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजदर 6 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे अनेक सरकारी व खाजगी बँका त्यांचा एमसीएलआर (MCLR) वाढवत आहेत.

हेही वाचा : ‘या’ 5 बँका देत आहेत स्वस्तात गृहकर्ज, घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues