घसरण अदानींच्या शेअर्सची, पण नुकसान LIC चं; तेही 18300 कोटींचे!! असे काय घडले? जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या एका रिपोर्टमुळे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, गौतम अदानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बुधवारी (25 जानेवारी) रोजी हा अहवाल प्रकाशित झाल्यापासून अदानी समूहाचे शेअर्स धडाधड आपटले. अदानी समूहाच्या समभागांच्या घसरणीने फक्त दोन ट्रेडिंग सत्रांने गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर खोलवर परिणाम केला. देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदार आयुर्विमा महामंडळ (LIC) देखील प्रभावित गुंतवणूकदारांपैकी एक राहिली. आणि काल अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या एका रिपोर्टमुळे LIC चे काल तब्बल 18300 कोटींचे नुकसान झाले असे का झाले? याचे नेमके कारण काय? यासाठी हि बातमी शेवट पर्यंत नक्की वाचा..
अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमुळे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीला एका दिवसात तब्बल 18,300 कोटी रुपयांचा तोटा झाला. परवा हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 25 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण नोंदवली गेली. कारण आयुर्विमा महामंडळाने म्हणजे lic ने अदानी समूहाच्या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
एलआयसीला कोणत्या कंपनीचे किती नुकसान झाले?
अदानी एंटरप्रायझेसच्या गुंतवणुकीत LIC ला 2700 कोटींचे नुकसान झाले आहे. अदानी ग्रीनमध्ये 875 कोटी, अदानी ट्रान्समिशनमध्ये 3050 कोटी, अदानी पोर्टमध्ये 3300 कोटी, एसीसीमध्ये 570 कोटी, अंबुजा सिमेंटमध्ये 1460 कोटी. या सात कंपन्यांचे एकूण 18305 कोटींचे नुकसान झाले आहे.
अदानी समूहात LIC ची किती भागीदारी आहे?
एलआयसीकडे अदानी एंटरप्रायझेसमध्ये 4.23 टक्के, अदानी पोर्टमध्ये 9.14 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 3.65 टक्के, अदानी ग्रीन गॅसमध्ये 1.28 टक्के, एसीसीमध्ये 6.41 टक्के आणि अंबुजा सिमेंटमध्ये 6.32 टक्के आहेत.
दरम्यान, अमेरिकन कंपनीने अदानी समूहावर आरोप केले असते तरी नुकसान मात्र गुंतवणूकदारांचे झाले. अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली.