Take a fresh look at your lifestyle.

Soyabean Diseases सोयाबीन पिवळी का पडते? ‘हे’ उपाय तुमची मदत करतील!

0

Soyabean Diseases अनेक शेतकरी बंधुच्या शेतातील सोयाबीन पिकाची पान पांढरे व नंतर पिवळे पडत शेवटी करपणे असा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आज आपण याची करणे आणि त्यावरील उपाय याबाबत माहिती जाणून घेऊयात…

Soyabean Diseases 1) गढीची माती किंवा पांढरी माती असणाऱ्या जमिनीत लोह म्हणजे फेरसच्या कमतरता असल्या कारणाने याबीन व इतर पिके सुरुवातीपासून पांढरट पिवळी पडतात.

Soyabean Diseases 2) चोपन किंवा चुनखडीचे प्रमाण आसलेल्या जमिनीत काही ठिकाणी तर इतर जमिनीत देखील जास्त जोराचा पाऊस किंवा पाणी साचून मुळांना हवा न लागल्यामुळे अन्न द्रव्याची कमतरता विशेषतः लोह (फेरस), जस्त (झिंक), नत्र व पालाशची कमतरता जाणवते.

3) यंदा अनेक शेतकऱ्यांनी हळद वअद्रक ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने लागवड केली. यामुळे हळद व अद्रक खूप खोल पडते. जवळपास 1 फुटापर्यंत. अशात यावर जोराचा पाऊस पडल्यानतर जमीन पॅक होते. तसेच खूप खोल पडल्यामुळे कोंब वर यायाला ताकद आणि वेळ लागतो. दरम्यान मुळांना हवा न लागल्यामुळे परत वरील अन्न द्रव्याची कमतरता जाणवते.

4) अनेक शेतकरी मागील हंगामात उरलेले सोयाबीन, हरबरा गव्हाचे कुटार शेतात पसरुन देतात. विशेषतः अशा ठिकाणी किंवा काडी कचरा जास्त असलेल्या ठिकाणी किंवा अर्धवट कुजलेले शेणखत वापरलेल्या ठिकाणी झाडे सुरवातीला पिवळी पडतात. नंतर बुडाजव स्केलोरोशिअम म्हणजे पांढऱ्या बुरशीची वाढ होते व उभळ लागते. हे एक प्रमुख कारण आहे.

5) काडी कचरा अधिक असलेल्या ठिकाणी म्हैस किडीचा प्रादुर्भाव अधिक दिसतो. अशा ठिकाणी पिकाचा जमिनीखालील भाग या किडीची अळी व म्हैस किडा कुरतडुन खातो व झाडाला ईजा होतात. अशाने झाड मरत नाही पण पिवळे पडते, वाढ खुंटते.

6) ज्या जमिनीत मागच्या हंगामात उन्हाळ्यात शेवटपर्यंत ओलित केले गेले. या ठिकाणी सुद्धा पिकामध्ये वरील अन्न द्रव्याची कमतरता येऊन पिक पांढरट पिवळे झाल्याचे दिसून येते.

7) ज्या जमिनी लालसर भुरकट हलक्या आहे. अशा ठिकाणी पालाशाची व नत्राची कमतरता येते. अशाने झाडाची पाने कडेकडून सुरुवातीस पिवळसर व नंतर लालसर करड्या किंवा तपकीरी होऊन वाळायला लागतात.

Soyabean Diseases खालील उपाय तुमची मदत करतील :
1) पांढऱ्या जमिनी असेल किंबहुना सर्वच जमिनीत पेरते वेळेस एकरी 10 किलो झिंक सल्फेट + 5 किलो फेरस सल्फेट + 10 किलो गंधक व खत वापरताना पोट्याश असलेले खत जसे 10-26-26 , 12-32-16, 14-35-14 अशी खत वापरा. बियाण्याला रायझोबीअम पीएसबी व केएम बी ची या द्रवरुप संवर्धकाची 10 मिली व ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रती किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करा.
2) पिक पिवळे दिसले तर सूक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण 20 ग्रॅम किंवा फेरस edta 15 ग्रॅम + झिंक edta 15 ग्रॅम व 19-19-19 70 ग्रॅम किंवा युरीया 2% प्रती पावर स्प्रे घ्या.
3) Soyabean Diseases लालसर जमिनीचा विचार केला तर पोटॅशची कमतरता दिसते. अशा जमिनीत पोटॅशयुक्त खत पेरते वेळेसच द्या. फवारणीत 13-0-45 किंवा 00-00-50 70 ग्रॅम घ्या व सोबत वरिलप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये घ्या.
4) शक्यतो कुटार व शेणखत चांगले कुजल्याशिवाय वापरु नका. किंवा अशा ठिकाणी कार्बन नत्र (C:N) गुणोत्तर कायम ठेवण्यासाठी सुरुवातीलाच 20 दिवसाच्या आत थोडा युरीया फेका. तसेच काडी कचरा, कुटार कुजतांना शेतावरील नत्र वापरले जाते व नत्राची कमतरता येते. व तेथे गर्मी तयार होऊन झाडाला बुरशी लागते बरं.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues