Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot tips : तुमचं डेबिट-क्रेडिट कार्ड चोरी झालं तर? नक्की वाचा या टिप्स

0

Krushidoot tips कॅशलेस व्यवहारात सर्वात महत्वाची भूमिका डेबिट व क्रेडिट कार्ड बजावतात. पंतप्रधान मोदींनी कॅशलेस इंडियाचा नारा दिल्यापासून डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर वाढतच चालला आहे. पण यामुळे अनेक अडचणीपण वाढत आहेत. अज्ञानपणामुळे व कार्ड चोरीला गेल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी कार्ड ब्लॉक करणं गरजेचं असत. म्हणून डेबिट-क्रेडिट कार्ड चोरी झालं तर काय करायचं? त्यावर एक नजर…

Krushidoot tips तुमचं डेबिट अथवा क्रेडिट कार्ड हारवलं किंवा चोरी झालं, तर सर्वात आधी तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुन कार्ड ब्लॉक करायला लावा.

त्यानंतर कार्ड हारवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर करा.

यानंतर बँकेत जाऊन कार्ड चोरी झाल्याची माहिती देऊन, नव्या एटीएमसाठी अर्ज करा.

तुमचं कार्ड चोरी झाल्यानंतर तुमच्या ऑनलाईन बँकिंगचा पासवर्ड तत्काळ बदला.

कार्ड हारवल्यानंतर सुरक्षिततेसाठी तुम्ही तुमच्या अकाउंटमधील पैसे तुमच्याच दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करु शकता.

इंटरनेट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार करताना सेव्ह डिटेल्सचा पर्याय नेहमी अनचेक ठेवा.

हेही वाचा : ‘या’ 5 बँका देत आहेत स्वस्तात गृहकर्ज, घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा!

SMS बँकिंग अलर्टचा ऑप्शन नेहमी सुरु ठेवा. ज्यामुळे तुमच्या कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहाराची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल.

एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सल बटन दाबा. जेणेकरुन तुमचा एटीएमचा पासवर्ड सुरक्षित राहिल.

प्रत्येक 2 किंवा 3 महिन्यांनी तुमच्या एटीएम आणि क्रेडिट कार्डचा पिन नंबर बदला.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues