Take a fresh look at your lifestyle.

Increase Brain Efficiency : तुमच्या मेंदूला ठेवा नेहमी सतेज; मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘हे’ करा

0

krushidoot health tips : आपल्या शरीराचा CPU म्हणजे आपला मेंदू. शरीराचं सर्व काम मेंदूपासून चालतं व संपूर्ण शरीरावर ताबाही मेंदूचाच. म्हणून शरीरात सर्वात जास्त महत्व मेंदूला दिले आहे आणि सुरक्षाही मेंदूलाच आहे. यामुळे आपण आपल्या मेंदूची काळजी घ्यायला पाहिजे. ती कशी यावर एक नजर… (Increase Brain Efficiency)

साखर कमी खा : जास्त साखर खाल्ल्यामुळे मेंदूपर्यंत बाकीचे पोषक द्रव्य पोहोचत नाहीत आणि याचमुळे पुढे अल्झायमर्सची रिस्क निर्माण होते.

स्वच्छ हवा : प्रदूषित वातावरणामुळे कमी व खराब ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचतो. यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते.

पुरेशी झोप : कमी झोपेमुळे अपायकारक द्रव्याचा निचरा होण्याची प्रक्रिया थांबून टॉक्सिक वेस्ट तसाच मेंदूत रहातो. याचा परिणाम ब्रेन सेल्सवर होतो.

विचार करा : वाचन, मनन, काव्य, विनोद ह्यावर थोडा वेळ द्या कारण विचार करणे हे मेंदूचं खरं काम आहे. ते थांबले कि मेंदूची कार्यक्षमता थांबते.

नाश्ता करा : आपण सकाळी जेव्हा नाश्ता टाळतो तेव्हा आपल्या रक्तात शर्करेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ब्रेन ह्यामरेजची रिस्क वाढते.

कमी जेवा : प्रमाणापेक्षा जास्त जेवण झालं तर यामुळे मेंदूला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या धमन्या कडक होऊन मानसिक शक्ती कमी होण्याची शक्यता असते.

धूम्रपान टाळा : धुम्रपानामुळे मेंदूच्या बाह्यपटलाची जाडी कमी होते. यामुळे Multiple brain shrinkage चा धोका वाढतो.

व्यक्त व्हा : जेवढं जास्त बोलाल, वाद-प्रतिवाद, चर्चा कराल तेवढा मेंदू तल्लख आणि वेगवान होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues