Take a fresh look at your lifestyle.

पिकांमध्ये गंधकाचा वापर काय आहे? ते किती महत्वाचे आहे? जाणून घ्या!

0

पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी आपण खताचा वापर करत असतो. मात्र शेतीची सर्वात मोठी गरज असते योग्य खताची निवड. त्यामुळे कोणत्या प्रकारचे खत शेतीसाठी फायदेशीर ठरू शकते? हे ओळखणे फार महत्वाचे आहे. शेतकरी सहसा D.A.P. युरिया आणि कधी-कधी म्युरिएट ऑफ पोटॅश वापरतात. सल्फर, जो मातीच्या पोषणातील चौथा आवश्यक घटक आहे, बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असेल. परिणामी पिकाच्या जमिनीत या घटकाची व्यापक कमतरता दिसून येते. सल्फर ज्याला गंधक म्हणून ओळखले जाते. पिकांमध्ये त्याचा वापर काय आहे? आणि ते किती महत्वाचे आहे? याबाबत जाणून घेऊया…

सल्फरचे तीन प्रकार आहेत : नॉनमेटल सल्फाईड, मेटल सल्फाईड आणि सेंद्रीय सल्फाईड (जे दाणेदार, पावडर आणि द्रव स्वरूपात आहेत.)

सल्फरचा वापर काय होतो?

 1. ते सर्व पिकांसाठी फायदेशीर आहे.
 2. यामुळे तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण वाढते.
 3. कीटकनाशक, टॉनिक म्हणूनही फायदा होतो.
 4. वनस्पतींमध्ये एंजाइमची क्रिया वाढवते.
 5. तंबाखू, भाज्या आणि चारा पिकांची गुणवत्ता वाढवते.
😢मेलेल्याला मारू नका, उसाची कांडी चोरू नका | 🙏 शेतकऱ्याचे मायबाप जनतेसाठी दोन शब्द | कृषिदूत

गंधकाच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये कोणती लक्षणे आढळतात? जाणून घ्या!

 1. झाडांचा पिवळा रंग होतो आणि ही कमतरता झाडांच्या वरच्या भागापासून किंवा नवीन पानांपासून सुरू होते.
 2. वनस्पतींची वाढ थांबते.
 3. झाडांची हिरवळ कमी करते.
 4. अन्न पिके तुलनेने उशीरा पिकतात. बियाणे नीट परिपक्व होत नाहीत.
 5. झाडे पिवळी, हिरवी, पातळ आणि आकाराने लहान होतात आणि झाडाची देठ पातळ आणि कडक होते.
 6. बटाट्याच्या पानांचा रंग पिवळा, स्टेम कडक आणि मुळांचा विकास कमी होतो.
 7. पीक फुलत नाही किंवा फळेही देत ​​नाही.

उपाय काय? : डाळी आणि तेलबिया पिके असलेल्या शेत जमिनीत सल्फरची कमी दूर करण्यासाठी, एस.एस.पी. फॉस्फो जिप्सम आणि सल्फर मिश्रित खतांचा वापर करा.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues