Take a fresh look at your lifestyle.

पीक कर्ज हवे आहे? जाणून घ्या प्रक्रिया आणि कागदपत्रे!

0

बऱ्याचदा खरीप हंगमात शेतकऱ्यांना पीककर्जाची आवश्यकता भासते. मात्र, हे पीककर्ज मिळवायचं कसं? त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात? याबाबतच जाणून घेऊयात…

तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने : शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज वाटपाचा ‘पॅटर्न’ आता राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ पासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याजाने मिळू शकणार आहे.

● पीककर्ज देणाऱ्या बँका : शेतकऱ्यांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत असते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे आवश्यक आहे. पीक कर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकता. पण, त्यासाठी पुढील काही कागदपत्रांची गरज असते.

● पीक कर्जासाठी (१.६० लाखांपर्यंत) लागणारी कागदपत्रं : 7/12 उतारा, 8 अ, नकाशा, आधार कार्ड प्रत, ३ फोटो, स्टॅम्प (कर्ज रकमेनुसार १०० रुपयांचे ३ किंवा ४ स्टॅम्प)

● पीक कर्जासाठी (१.६० लाखांपेक्षा जास्त) लागणारी कागदपत्रं : 7/12 उतारा, 8 अ, नकाशा आणि चतुर्सीमा, फेरफार, मूल्यांकन पत्र, सर्व रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असल्यास वकिलांनी सुचविलेले अतिरिक्त कागदपत्रे, आधार कार्ड प्रत, ३ फोटो, स्टॅम्प आणि स्टॅम्प ड्युटी (कर्जाच्या रकमेनुसार)

पीककर्ज नुतनीकरणासाठी : 7/12 उतारा आणि 8 अ (संगणीकृत प्रत देखील चालेल), आधार कार्ड प्रत, नवीनीकरण अर्ज (बँक शाखेतून मिळेल), पीकविमा काढण्याचा अर्ज, पीकविमा हा ऐच्छिक आहे.

…तर व्याजात सूट : ३ लाखांपेक्षा कमी कर्ज घेणारे, आणि (वेगवेगळ्या बँकांच्या नियमानुसार, बहुतेक वेळा ३१ मार्चच्या आत) १२ महिन्यांच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच यात खास सूट दिली जाते. दरम्यान तुमच्याकडे कितीही जमीन असो तुम्हाला ३ लाखांच्या पिककर्जासाठीच व्याजात सूट दिली जाते.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.