Take a fresh look at your lifestyle.

Kitchen Tips : स्वयंपाक करताना ‘या’ चुका टाळा!

0

Kitchen Tips 1) भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. कारण यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे पाणी फेकू नाही. हे पाणी भाजीत किंवा कणीक मळताना ही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवर ही शिजवू शकता.

Kitchen Tips 2) भाज्या किंवा फळे 4-5 तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेचा अभाव असल्यास फळे, भाज्या आधीच कापून ठेवाच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा.

Kitchen Tips 3) कढईत एखादा पदार्थ बनवताना त्यावर नेहमी झाकण ठेवावे. असे केल्याने पदार्थ लवकर शिजतो आणि त्यातील पौष्टिक तत्त्वही नष्ट होत नाही.

हेही वाचा : कोंडा काही मिनिटांत होईल गायब, नक्की वाचा रामबाण उपाय

Kitchen Tips 4) तळण झाल्यावर उरलेले तेल दुसर्‍या पदार्थासाठी वापरण्याची सवय अगदी सामान्य आहे. पण ही पद्धत चुकीची आणि आरोग्यास हानिकारक आहे. उरलेले तेल पुन्हा उकळल्याने त्यातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा, रक्तदाब आणि हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता असते.

Kitchen Tips 5) फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ जसे दूध, क्रीम, बटर, अंडी, उरलेले अन्न व इतर पदार्थांना काढल्यावर ताबडतोब गरम करू नये. पदार्थ वापरण्याआधी अर्धा तास बाहेर काढून ठेवावे.

Kitchen Tips 6) मायक्रोव्हेवमध्ये जेवण बनवताना प्लास्टिक कंटेनरचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. त्याऐवजी मायक्रोसेफ ग्लास बाऊलचा वापर करावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues