Take a fresh look at your lifestyle.

Kasuri methi : घरच्या घरी कशी बनवाल कसुरी मेथी? 20 रूपयांत वर्षभर पुरून उरेल!

0

Kasuri methi हिवाळा सुरु झाला असून विशषतः सकाळच्या वेळी वातावरणात एक वेगळ्याच प्रकारचा गारवा जाणवू लागला आहे. प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या भाज्या बाजारात येतात. हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध असणारी भाजी म्हणजे मेथी. मेथीपासून अनेक प्रकारच्या डिशेश बनवता येतात. मेथी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते. मेथीपासून बनलेली ‘कसुरी मेथी’ हा पदार्थ तर तुम्हाला प्रत्येकालाच माहित असेल. काही भाज्यांची चव वाढवण्याचं काम कसुरी मेथी करते.

Kasuri methi बहुदा कसुर मेथी बाहेरून आणली जाते. पण तुम्ही घरच्या घरी कसुरी मेथी बनवू शकता आणि वर्षभर वापरू शकता. विशेष म्हणजे यासाठी फार वेळ आणि पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाही. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी कशी बनवाल कसुरी मेथी? स्टेप्स जाणून घेऊयात…

  1. सर्वप्रथम मेथीची पानं काढा. लक्षात ठेवा पानं काढताना तुम्हला त्यात देठ घ्यायचे नाही. आता या पानांना व्यवस्थित धुवून चाळणीत सुकवायला ठेऊन द्या.
  2. पाणी निथळल्यावर मायक्रोवेव्ह फ्रेंडली ट्रे घ्या. यात हि पानं व्यवस्थित पसरवून मायक्रोवेव्ह हाय टेम्परेचरला सेट करा आणि 3-4 मिनिट ठेऊन द्या.
  3. यानंतर ट्रे बाहेर काढून घ्या, पसरवलेली पानं पुन्हा एकदा हलवून घ्या आणि 2 मिनिटासाठी पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन द्या. यानंतर काही वेळा साठी पूर्ण पाने थंड होऊ द्या.
  4. जेव्हा मेथीची पानं पूर्णपणे थंड होतील तेव्हा दोन्ही हातात घेऊन ती रगडून पावडर बनवून घ्या. ही पावडर एका हवाबंद डब्ब्यात भरून ठेऊन द्या. कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरच्या घरी वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी बनून तयार आहे!

हेही वाचा : हिवाळ्यात घसा खवखवणे, दुखणे यामुळे त्रस्त आहात? वाचा ‘या’ खास टिप्स

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues