Take a fresh look at your lifestyle.

जांभूळ प्रक्रिया व्यवसाय संधी – कृषी व्यवसाय

0

महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण भागांमध्ये जांभूळ फळांचे उत्पादन होते खरे मात्र प्रक्रियेच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होते. जर याचे योग्य व्यवस्थापन केल्यास निश्चित फायद्याचे ठरू शकते. तसेच ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती देखील होईल. या लेखात आज आपण जांभूळ प्रक्रियेमधील संधी? प्रक्रियायुक्त पदार्थ याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात…

‘या’ आहेत जांभूळ प्रक्रियेच्या संधी!

● जांभळाच्या फळांमध्ये आहार मूल्य व औषधी गुणधर्म असल्याने फळांना बाजारपेठेत मागणी असते.
● जांभूळ फळांपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यास औषधी गुणधर्माचा वापर होईल.
● हंगाम नसताना फळांचा आस्वाद घेता येईल असे प्रक्रिया उद्योग खेडोपाडी उभारल्यास रोजगार निर्मिती होऊ शकेल.
● आपण रस, सरबत, स्क्वॅश, सिरफ, वाईन, जेली, बर्फी टॉफी, पावडर आदी पदार्थ तयार करू शकता. याला बाजारपेठेत चांगली मागणी देखील आहे.

विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करू शकता

जांभळाचे सरबत :
● सर्वात अगोदर पिकलेली व आकाराने आणि मोठी फळे निवडा.
● स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर जांभळी पल्परच्या साह्याने त्याचा रस काढा.
● एकजीव गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 82 हाऊस सेंटीग्रेड तापमानाला 20 मिनिटे गरम करा.
● यामुळे रस्सामधील रंग द्रव्याचे प्रमाण जास्त मिळते.
● रसामध्ये साखर, सायट्रिक ऍसिड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घ्या.
● रसामध्ये मिसळून ते मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्या.
● नंतर हे मिश्रण थोडा वेळ गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरा.
● हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरड्या जागेवर साठवून ठेवा.
जांभूळ गर : एक लिटर, साखर एक किलो, पाणी चार लिटर, सायट्रिक ऍसिड दोन ग्रॅम पाहिजे

जांभळाचे स्क्वॅश :
● सर्वप्रथम पिकलेल्या निरोगी चांगल्या फळांची निवड करा.
● फळे स्वच्छ धुतल्यानंतर पल्परच्या साह्याने त्याचा रस काढा.
● एकजीव झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घेऊन 80 ते 82 अंश सेंटिग्रेड तापमानाला 30 मिनिटे गरम करा.
● यामुळे रस्सामधील रंग द्रव्याचे प्रमाण जास्त मिळते. रसामध्ये साखर, सायट्रिक ऍसिड, पाणी व परिरक्षक योग्य प्रमाणात घेऊन रसामध्ये मिसळून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्या.
● नंतर हे मिश्रण थोडेसे गरम करून निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत हवाबंद करून लेबल लावून थंड किंवा कोरड्या जागेवर साठवून ठेवा.
जांभळाचा रस : एक लिटर,साखर एक किलो, पाणी चार लिटर, सायट्रिक ऍसिड दोन ग्रॅम

जांभळाच्या बियांचे पावडर
● गर काढून घेतल्यानंतर राहिलेल्या बिया पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
● त्या बिया ट्रेमध्ये पातळ पसरून ते ट्रे ड्रायरमध्ये 55 ते 60 अंश सेंटिग्रेड तापमानास 18 ते 20 तास ठेवा.
● नंतर हे उन्हात वाळवावेत. वाळलेल्या बिया मिक्सर किंवा ग्राइंडर च्या मदतीने पावडर तयार करा.
● यानंतर पावडरचे वजन करून पॉलिथिनच्या पिशवीत भरून पिशव्या हवाबंद करून लेबल लावून कोरड्या जागी साठवून ठेवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues