Take a fresh look at your lifestyle.

तुमच्या नावावर असलेले सिमकार्ड दुसरे कोणी वापरात तर नाही ना?

0

सिम कार्ड हि आपल्या मोबाईल मधील सर्वात महत्वाची वस्तू असते हे सर्वांना नक्कीच माहिती आहे. सिम कार्ड नसेल तर मोबाईल ही काही कामाचा नसतो. या सिम कार्ड मध्ये आपले अनेक कॉन्टॅक्टस, वैयक्तिक माहिती ही सेव्ह असते. तसेच जेव्हा आपण हे सिम कार्ड खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला आधार कार्डची गरज पडते. पण तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापरही होऊ शकतो किंवा तुमच्या अधिकार्ड वर कोणी दुसरे जण, याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेलच.

परंतु मित्रांनो आता चिंता नको भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल लॉन्च केला आहे. त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण स्वतःच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत ते चेक करू शकतो आणि जर आपल्या नावावर एकापेक्षा जास्त सिमकार्ड असतील आणि ते जर आपण वापरत नसाल तर ते सिम कार्ड कसे बंद करायचे, हे आपण या लेखात पाहणार आहोत.

तुमच्या नावावर किती SIM Card आहेत हि सोपी पद्धत वापरून करा चेक

स्टेप 1: सर्वात प्रथम तुमच्या ब्राउझर मधून taf cop ची वेबसाईट tafcop.dgtelecom.gov.in ओपन करायची आहे.

स्टेप 2: वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हला तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल. तर दिलेल्या बॉक्स मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून Request OTP ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, आता तुमच्या मोबाईल वर एक OTP येईल तो टाकून व्हेरिफाय करायचा आहे व नंतर Validate बटन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3: आता Validate वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ वर जे मोबाईल नंबर चालू आहेत, त्यांची यादी दिसेल. जर तुम्ही वापरत असलेल्या नंबर शिवाय आणखी नंबर दिसत असतील, जे तुम्ही वापरत नाही किंवा तुमचे नाहीत, तर ते तुम्ही सिमकार्ड बंद करू शकता.

सिमकार्ड बंद करण्यासाठी

तुमच्या समोर जी यादी आहे, त्या यादीमधले सिमकार्ड तुमच्ये नसेल, ते तुम्हाला बंद करायचे असेल तर, तुम्ही पहिला ऑप्शन निवडा (This is not my number) म्हणजे हे सिमकार्ड माझे नाही या पर्यायावर क्लिक करा.

Krushidoot Tips : प्रवास करताना मळमळ होते? वापरा या युक्त्या आणि लुटा प्रवासाचा मनमुराद आनंद

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues