Take a fresh look at your lifestyle.

ड्रिप मध्ये खूप घाण अडकली आहे का? वाचा स्वस्तातले उपाय

0

शेतकरी बंधू-भगिनींनो आज आपण पाहणार आहोत ड्रिप साफ करण्याची सविस्तर माहिती…

१. आम्ल प्रक्रिया
लॅटरल व ड्रीपरमध्ये साचलेले क्षार स्वच्छ करण्यासाठी आम्ल प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी सल्फ्युरीक ऍसिड (65 टक्के), हायड्रोक्लोरीक ऍसिड (33 टक्के), नायट्रीक ऍसिड (60 टक्के) किंवा फॉस्फेरीक ऍसिड (85 टक्के) चा वापर करावा.
१. एका प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये एक लिटर पाणी घेऊन, त्यात ऍसिड मिसळत जावा.
२. आम्ल मिसळताना मध्येमध्ये पाण्याचा सामू पीएच पेपर किंवा कलर चार्टने मोजावा.
३. पाण्याचा सामू 3 होईपर्यंत पाण्यात ऍसिड मिसळत जावा.
४. संचामधून पाणी वाहण्याचा दर लक्षात घेऊन 15 मिनिटांत त्या संचामधून किती पाण्याचा विसर्ग होणार आहे, त्याचा हिशेब करून त्यासाठी लागणारे ऍसिड काढावे.

त्यासाठीचे सूत्र खालील प्रमाणे आहे :
एकूण 15 मिनिटांत संचामधून सोडायचे आम्ल (लिटर) = 15 मिनिटांत संचातून होणारा पाण्याचा विसर्ग (लिटर) x 1 लिटर पाण्याचा सामू 3 होण्यासाठी लागणारे आम्ल (लिटर)

आम्ल प्रक्रिया करण्याची पद्धत :
१. आम्ल प्रक्रिया करण्यापूर्वी, अंशतः किंवा पूर्ण बंद पडलेले ड्रीपर्स खूण करून ठेवा. तसेच फिल्टर, मेन आणि सबमेन लाइन फ्लश करून घ्या.
२. सिंचन संच सामान्य दाबाने चालू ठेवा व वरील सूत्राप्रमाणे मिळवलेले आम्लाचे द्रावण तयार करून घ्या.
३. पाण्याचा संचामधून किती प्रवाह चालू आहे, ते तपासून त्यानुसार प्रवाह निश्चित करा.
४. योग्य प्रमाणात आम्लाचे द्रावण प्रणालीमध्ये सोडायला सुरू करा. या वेळी आम्लाच्या द्रावणाचा दर पूर्ण प्रवाहाचा सामू हा 3 राहील अशा प्रकारे निश्चित करा.
५. आम्ल द्रावण साधारणतः 15 मिनिटे संचातून सोडणे चालू ठेवा व आम्ल द्रावण संपल्यावर फर्टिलायझर पंप किंवा व्हेंच्युरी बंद करा.
६. ठिबक संच 24 तास बंद ठेऊन निर्धारित वेळेनंतर संपूर्ण ठिबक सिंचन प्रणाली 15 ते 20 मिनिटे चालवून फ्लश करून घ्या.
७. आधी खूण केलेल्या ड्रीपर्समधून पाणी पूर्ण क्षमतेने पडत आहे किंवा नाही हे तपासून पहा. पूर्ण क्षमतेचे पाणी बाहेर पडत नसल्यास वरीलप्रमाणे प्रक्रिया पुन्हा करा.

Leave A Reply

Your email address will not be published.