Take a fresh look at your lifestyle.

उन्हाळी कांद्याच्या भावात का होतेय घसरण? भाव वाढ होईल का?

0

महाराष्ट्र आणि कांद्याचे एक वेगळेच कनेक्शन आहे. आपलीकडे कांद्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. त्यामुळेच हा कांदा देशातील अनेक राज्यात पाठवला जात असतो.

गेल्या दीड महिन्यांचा विचार करता कांद्याचे भाव टिकून होते परंतु गेल्या आठवड्यापासून उन्हाळी कांद्याच्या भावात कमालीची घसरण झालीय. गत आठवड्याचा तुलनेत कांदा प्रती क्विंटल शंभर ते तीनशे रुपयांनी घसरला आहे.

मागणी कमी झालीय : कांदा निर्यात करण्यावर मर्यादा आल्याने घसरणीची परीस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाकिस्तानचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा सात रुपये प्रती किलो दराने स्वस्त मिळत आहे. श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, मलेशियामध्ये लॉकडाउनमध्ये वाढल्याने देखील कांद्याची मागणी कमी झाली आहे.

दरम्यान आखाती राष्ट्रात पाकिस्तानच्या कांद्यास चांगली पसंती मिळत आहे. यासोबत श्रीलंका, बांगलादेश, थायलंड मलेशिया या देशांमध्ये कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यामधून मागणी लॉकडाऊनमुळे कमी आहे. जेष्ठ व्यापारी म्हणत आहेत कि, जुलै व ऑगस्ट महिन्यात देशात पाऊस किती प्रमाणात पडतो? यावर पुढील गणित अवलंबून राहील.

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.